तुळजापूर – तुळजापूरच्या जुन्या बसस्थानक परिसरात श्रीदेवी मटक्याचं “शो” रंगलेलं असताना, पोलिसांनी अचानक ‘एंट्री’ घेतली आणि ‘कट्ट्यावरची कटिंग’ थांबवून जुगारवेड्यांचं थेट ‘कटिंग’ करून टाकलं. पण खरी धमाल तर नंतर झाली – कारण यातील एक आरोपी, सुरज सतीश कोठावळे, काही सामान्य मटका प्रेमी नाही; हा थेट शिंदेगटाच्या युवासेनेचा जिल्हा प्रमुख! म्हणजे मटक्याच्या तंबूत ‘सेनेचा’ झेंडा डौलात फडकताना सापडला!
आता काय – सोशल मीडियावर फोटो झळकलेत. खुद्द पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतचे ‘फोटोभाई’ सुरज कोठावळेची ही कारगुजारी बाहेर पडल्यावर, राजकीय गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच कुजबुज सुरू आहे – ‘हे काय सुरूय बॉss?’
कारवाईचा थरार:
रविवार दि. ६ एप्रिल रोजी दुपारी १२:१० वाजता पोलिसांनी छापा मारला तेव्हा श्रीदेवी मटक्याचं “लाईव्ह सेशन” सुरू होतं. नितीन तुकडे आणि सुरज कोठावळे हे दोघेही अगदी ‘हट्टी कट्टी’ पद्धतीने मटक्याची तासगणती करत होते. पण पोलिसांनी त्यांची गडबड उडवली आणि तब्बल १,८९० रुपयांचं ‘जुगारी साहित्यान्नं’ पकडून ताब्यात घेतलं.दोघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस म्हणाले:
“शहरात कोणताही अवैध धंदा खपवणार नाही! ‘मटका’ असो वा ‘मंडळी,’ सगळ्यांचं पत्तं काढणारच!”
आणि जनता म्हणते:
“आमच्या पोराला मटका लावला तर त्याला पोलिसांनी पिचकावलं, आणि इकडं युवासेनेच्या जिल्हा प्रमुखाला ‘श्रीदेवी’चं ‘वरदहस्त’?”
राजकीय वर्तुळात आता प्रश्न एकच – ‘मटका बुकीचं नशीब लागलं कोणाला?’