तुळजापूर: शहरात गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात आज पोलिसांनी न्यायालयात तब्बल १० हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रामुळे आरोपींच्या संख्येत आणखी एका नावाची भर पडली असून, माजी नगराध्यक्ष संतोष कदम-परमेश्वर यांचे नाव नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ३५ वरून ३६ झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ३६ आरोपींपैकी १४ जणांना आतापर्यंत अटक करण्यात यश आले असून, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र, २२ आरोपी अद्याप फरार आहेत.
फरार असलेल्या आरोपींमध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आहे. यामध्ये माजी नगराध्यक्षांचे पती पिटू उर्फ विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे, नव्याने नाव समाविष्ट झालेले माजी नगराध्यक्ष संतोष कदम-परमेश्वर, माजी सभापती शरद जमदाडे आणि इंद्रजित ठाकूर यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
पोलिसांनी १० हजार पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके कार्यरत असून, पुढील तपास सुरू आहे.
१० हजार पानांचा डोंगर, पण २१ आरोपी फरार! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार?
तारखेनिहाय घटनाक्रम
- १५ फेब्रुवारी: तामलवाडी येथे कारमध्ये ४५ ग्रॅम ड्रग्ज (५१ पुड्या) आणताना तीन आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये काही जप्त केली. यात तुळजापूर येथील अमित आरगडे व देविदास दळवी तर तुळजापूर येथील संदीप राठोड यांना अटक करण्यात आली.
- २० फेब्रुवारी: आरोपींची संख्या पाचवर गेली. यामध्ये पोलिस तपासात ड्रग्ज पुरवठा करणारी मुंबईतील संगीता गोळे व तुळजापूर येथील स्वराज तेलंग याचे नाव समोर आले. पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी महिलेस मुंबईतून ताब्यात घेतले.
- २२ फेब्रुवारी: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी १९ जणांचा सहभाग असल्याचा आरोप केला. पोलिस तपासात कॉल डिटेल्सवरून ही नावे समोर आल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
- १ मार्च: म्होरक्या पिंटू मुळे याला पोलिसांनी अटक केली. त्याला २१ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
- २५ मार्च: पोलिस तपासात ड्रग्ज तस्करीतील आरोपींची संख्या १९ वर पोहचली. सुलतान शेख याला नळदुर्ग येथून तर जीवन साळुंखे याला सोलापुरातून ताब्यात घेतले. १९ पैकी सात आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- २६ मार्च: आरोपींच्या संख्येत वाढ होत २५ वर पोहचली. यामध्ये राजकारणातील चंद्रकांत कणे, विनोद उर्फ पिंटू गंगणे, शरद जमदाडे यांची नावे समोर आली. २५ पैकी १२ आरोपी फरार घोषित करण्यात आले तर १३ जणांना अटक केली होती.
- १५ एप्रिल: तपास अधिकाऱ्यांकडून जिल्हा न्यायालयात १० हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल. यामध्ये 22 फरार तर 14 अटक असलेल्या आरोपींविरोधात माहिती देण्यात आली आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी (एकूण १४):
१. सुलतान लतीफ शेख (वय ३४) – पुणे
२. जीवन नागनाथ साळुंखे (वय २९) – सोलापूर
३. राहुल कदम – परमेश्वर (तुळजापूर) – पोलिसाचा मुलगा
४. गजानन प्रदीप हंगरगेकर
५. विश्वनाथ उर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – सराटी, ता. तुळजापूर
६. सयाजी शाहूराज चव्हाण (वय २५) – तुळजापूर
७. ऋतुराज सोमनाथ गाहे (वय २४) – तुळजापूर
८. सुमित सुरेशराव शिंदे (वय ३५) – तुळजापूर
९. संकेत अनिल शिंदे (वय २३) – तुळजापूर
१०. संगिता वैभव गोळे (वय ३२) – मुंबई
११. संतोष अशोक खोत (वय ४९) – मुंबई
१२. अमित उर्फ चिम्या अशोकराव अरगडे (वय ३३) – तुळजापूर
१३. युवराज देवीदास दळवी (वय ३८) – तुळजापूर
१४. संदीप संजय राठोड (वय २२) – नळदुर्ग, ता. तुळजापूर
फरार आरोपींची यादी (एकूण २२):
१. विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
२. चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
३. संतोष कदम-परमेश्वर – माजी नगराध्यक्ष
४. शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
५. इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर – नळदुर्ग
६. स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग – तुळजापूर (माजी नगराध्यक्षांचा हस्तक)
७. वैभव अरविंद गोळे – मुंबई (आरोपी संगिता गोळे हिचा पती)
८. प्रसाद उर्फ गोटन कदम – परमेश्वर (तुळजापूर)
९. उदय शेटे
१०. आबासाहेब गणराज पवार
११. अलोक शिंदे
१२. अभिजित गव्हाड
१३. विनायक इंगळे – तुळजापूर
१४. शाम भोसले – तुळजापूर
१५. संदीप टोले – तुळजापूर
१६. जगदीश पाटील – तुळजापूर
१७. विशाल सोंजी – तुळजापूर
१८. अभिजीत अमृतराव – तुळजापूर
१९. दुर्गेश पवार – तुळजापूर
२०. रणजीत पाटील – तुळजापूर
२१. नाना खुराडे – तुळजापूर
२२. अर्जुन हजारे – उपळाई खुर्द, सोलापूर