• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नातेवाईकांच्या सांभाळावरून वाद: परंड्यात कुटुंबावर कुऱ्हाड, रॉडने जीवघेणा हल्ला; ९ जणांवर गुन्हा

admin by admin
April 18, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव: बँक अपडेटच्या नावाखाली व्यावसायिकाला २४ लाखांचा गंडा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा –  आत्या आणि मामा यांच्या सांभाळावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गंभीर हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील काटेवाडी येथे घडली आहे. गुरुवारी सकाळी एका कुटुंबातील व्यक्तीला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाड, लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी अंबी पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी विनोद दत्तात्रय जाधव (वय ३९, रा. काटेवाडी, ता. परंडा) यांनी अंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी (दि. १७ एप्रिल २०२५) सकाळी सुमारे ९ वाजता काटेवाडी येथे आरोपी उमाजी हंबीरराव भांदुर्गे, शिवाजी हंबीरराव भांदुर्गे, नेताजी हंबीरराव भांदुर्गे (तिघे रा. भोंजा, ता. परंडा), शंकुतला वसंत गांगर्डे (रा. शेळगाव, ता. परंडा) आणि त्यांचे इतर पाच साथीदार यांनी गैरकायद्याची मंडळी जमवली.

आत्या व मामा यांना सांभाळण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी विनोद जाधव यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने, लोखंडी रॉडने आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या हल्ल्यात विनोद जाधव गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीची पत्नी आरती, भावजय अल्का आणि आई विजयमाला या भांडण सोडवण्यासाठी पुढे आल्या असता, आरोपींनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर विनोद जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबी पोलिसांनी नऊ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०९ (हत्येचा प्रयत्न), ११८(१) (गंभीर दुखापत), ११८(२) (घातक हत्याराने गंभीर दुखापत), ११५(२) (घातक हत्यारांसह दंगा), ३५१(२) (जीवे मारण्याची धमकी), ३५२ (मारहाण), १८९(२) (गैरकायदेशीर जमाव), १९१(२) (दुखापत करणे), १९१(३) (घातक हत्याराने दुखापत करणे), १९० (अन्यायकारक अडवणूक) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

ढोकीत कत्तलीसाठी गायींची निर्दयी वाहतूक; लाखोंचा मुद्देमाल जप्त, चालकावर गुन्हा

Next Post

धाराशिव: इंस्टाग्राम स्टोरीवर ‘हसण्याची इमोजी’ टाकली म्हणून तरुणाला दगडाने मारहाण

Next Post
येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

धाराशिव: इंस्टाग्राम स्टोरीवर 'हसण्याची इमोजी' टाकली म्हणून तरुणाला दगडाने मारहाण

ताज्या बातम्या

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

September 12, 2026
‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

September 11, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!

September 11, 2026
बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026

Recent Posts

  • प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट
  • ‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा
  • ‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!
  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!