• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग: शेतात काम करण्यावरून वाद; मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ

दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

admin by admin
April 20, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीतील चिवरी शिवारात शेतात काम करण्यावरून झालेल्या वादातून एका युवकाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी नागेश खंडु गायकवाड (वय २१, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास चिवरी शिवारात रुबाब खुशालद्दीन शेख यांच्या शेतात ही घटना घडली.

फिर्यादी नागेश गायकवाड हे रुबाब शेख यांच्या शेतात काम करत असताना, आरोपी अकबर खुशालद्दीन शेख आणि सुलेमान अकबर शेख (दोघे रा. अणदुर) यांनी त्यांना ‘तु रुबाब शेख यांच्या शेतात कशाला काम करतोस? माझ्या शेतात काम कर’ असे म्हणून अडवले. याचवेळी आरोपींनी नागेश गायकवाड यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

जातीवाचक शिवीगाळ करून थांबले नाहीत, तर आरोपींनी नागेश गायकवाड यांना लाथाबुक्यांनी आणि खोऱ्याच्या दांड्याने निर्घृण मारहाण केली. या मारहाणीत नागेश गायकवाड जखमी झाले आहेत. तसेच आरोपींनी त्यांना ‘तुला जिवे ठार मारू’ अशी धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर नागेश गायकवाड यांनी १९ एप्रिल २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार सांगितला व तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी आरोपी नामे-अकबर खुशालद्दीन शेख आणि सुलेमान अकबर शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(५) सह ३(१)(आर), ३(१)(आय) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव: बांधकाम साहित्याच्या नावाखाली २ कोटी २० लाखांची आर्थिक फसवणूक

Next Post

येरमाळा: भावाला शिवीगाळ का केली विचारले म्हणून कुऱ्हाड व काठीने डोक्यात मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

येरमाळा: भावाला शिवीगाळ का केली विचारले म्हणून कुऱ्हाड व काठीने डोक्यात मारहाण

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!