• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा: भावाला शिवीगाळ का केली विचारले म्हणून कुऱ्हाड व काठीने डोक्यात मारहाण

वडील व दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
April 20, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा-  येरमाळा पोलीस ठाणे हद्दीतील वाघोली येथे कुटुंबातील वाद विकोपाला जाऊन एका व्यक्तीला कुऱ्हाड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. भावाला शिवीगाळ का केली, असे विचारल्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आला असून, या प्रकरणी वडील व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जखमी संभाजी महादेव धोंगडे (वय ४६, रा. वाघोली ता.कळंब जि. धाराशिव) यांच्या वैद्यकीय जबाबावरून येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास वाघोली येथील बस स्टँड चौकातील चिकन सेंटर दुकानासमोर ही घटना घडली.

फिर्यादी संभाजी धोंगडे यांनी आरोपी शहाजी भागवत धोंगडे, सौरभ शहाजी धोंगडे आणि शुभम शहाजी धोंगडे (सर्व रा. वाघोली) यांना त्यांच्या भावाला शिवीगाळ का केली, असे विचारले होते. या किरकोळ कारणावरून आरोपींनी संभाजी धोंगडे यांना शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्यांनी, तसेच कुऱ्हाडीने व काठीने त्यांच्या डोक्यात गंभीर मारहाण केली.

या हल्ल्यात संभाजी धोंगडे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीनंतर आरोपींनी त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जखमी संभाजी धोंगडे यांच्या वैद्यकीय जबाबावरून १९ एप्रिल २०२५ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात आरोपी शहाजी भागवत धोंगडे, सौरभ शहाजी धोंगडे, शुभम शहाजी धोंगडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ११८(१), ११८(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

Previous Post

नळदुर्ग: शेतात काम करण्यावरून वाद; मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ

Next Post

तुळजापूर: महामार्गावर गुजरात येथील प्रवाशाची २ लाख ७२ हजार रुपयांची स्विफ्ट डिझायर कार लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: महामार्गावर गुजरात येथील प्रवाशाची २ लाख ७२ हजार रुपयांची स्विफ्ट डिझायर कार लंपास

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!