वाशी : जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांचा जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागू असताना वाशीत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा घेणाऱ्या दोन मराठा आयोजकांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
1)संदीपान नामदेवराव कोकाटे, 2) आप्पासाहेब देशमुख दोघे रा. ईट, ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.19.11.2023 रोजी 22.00 ते 23.05 वा. सु. हायस्कुल कन्या प्राथमिक शाहा ईट येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी धाराशिव यांचा जिल्ह्यात जमाव बंदी आदेश लागु असताना मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण संदर्भाने सभा आयोजीत केली.
दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सभा चालु ठेवून आदेशाचे उल्लघंन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- दादाराव शिवाजी औसरे, वय 33 वर्षे, पोलीस अमंलदार/144 नेमणुक- पोलीस ठाणे वाशी यांनी दि.19.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 188, भा.दं.वि.सं. सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
तामलवाडी :आरोपी नामे- 1) अंकुश शिवाजी शिरगिरे,2 ) सुरेश शिवाजी शिरगिरे, दोघे रा. गोंधळवाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.18.11.2023 रोजी 23.30 वा. सु. गोंधळवाडी पिंपळा खु जाणारे रोडवर गोंधळवाडी शिवार येथे फिर्यादी नामे-संजय जगन्नाथ शिनगिरे, वय 30 वर्षे, रा. गोंधळवाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे शेत रोटर करण्यासाठी आलेले समाधान कदम यांना नमुद आरोपींनी त्यांचे शेतातुन ट्रॅक्टर नेहण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करत असताना फिर्यादी हे भांडण सोडवत असतान नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तुला व तुझे कुटुंबाला जिवे मारुन टाकू अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- संजय शिनगिरे यांनी दि.19.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 427,34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नुकसान करणे
बेंबळी : फिर्यादी नामे-बाळु राघु सुळ, वय 25 वर्षे, रा. आल्लीबादी इंडीरोड विजापूर, कर्नाटक यांची अंदाजे 6,000₹ किंमतीची मेंढीस आरोपी नामे- बबन विठ्ठल लोखंडे, रा. तोरंबा ता.जि. धाराशिव यांनी दि.19.11.2023 रोजी 14.00 वा. सु. विळ्याने मारुन जखमी करुन नुकसान केले. फिर्यादी हे सोडवण्यास गेले असता त्यांना ही नमुद आरोपीने शिवीगाळ करुन डोक्यात विळ्याने मारुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बाळु सुळ यांनी दि.19.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 429, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.