तुळजापूर – संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एका फरारी आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले आहे. नानासाहेब अण्णासाहेब कुऱ्हाडे (रा. तुळजापूर, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर तालुक्यातील वांगणी येथून ताब्यात घेण्यात आले. या अटकेमुळे प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या १८ झाली असून, १८ आरोपी अद्यापही फरार आहेत.
मागील दीड महिन्यापासून फरारी असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची विविध पथके कार्यरत होती. याच आठवड्यात माजी उपसभापती शरद जमदाडे आणि त्यानंतर माजी नगराध्यक्षांचा भाचा आबासाहेब पवार यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एलसीबीचे एपीआय कासार आणि त्यांच्या पथकाने महत्त्वपूर्ण कारवाई करत नानासाहेब कुऱ्हाडे याला सोमवारी रात्री उशिरा वांगणी येथून ताब्यात घेतले. त्याला आज (मंगळवार) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
प्रकरणाची सद्यस्थिती:
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण ३६ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यापैकी २६ जणांचा समावेश ड्रग्ज विक्री करणाऱ्या गटात आहे, तर १० जण ड्रग्ज सेवन करणाऱ्यांच्या गटातील आहेत.
- एकूण निष्पन्न आरोपी: ३६
- अटक झालेले आरोपी: १८ (यामध्ये नव्याने अटक झालेल्या कुऱ्हाडेसह, पवार आणि जमदाडे यांचा समावेश आहे. यापैकी १५ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.)
- फरार आरोपी: १८
- विक्री गट आरोपी: २६
- सेवन गट आरोपी: १०
न्यायालयीन कोठडीत असलेले १४ आरोपी:
१. सुलतान लतीफ शेख (वय ३४) – पुणे
२. जीवन नागनाथ साळुंखे (वय २९) – सोलापूर
३. राहुल कदम – परमेश्वर (तुळजापूर) – पोलिसाचा मुलगा
४. गजानन प्रदीप हंगरगेकर
५. विश्वनाथ उर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – सराटी, ता. तुळजापूर
६. सयाजी शाहूराज चव्हाण (वय २५) – तुळजापूर
७. ऋतुराज सोमनाथ गाहे (वय २४) – तुळजापूर
८. सुमित सुरेशराव शिंदे (वय ३५) – तुळजापूर
९. संकेत अनिल शिंदे (वय २३) – तुळजापूर
१०. संगिता वैभव गोळे (वय ३२) – मुंबई
११. संतोष अशोक खोत (वय ४९) – मुंबई
१२. अमित उर्फ चिम्या अशोकराव अरगडे (वय ३३) – तुळजापूर
१३. युवराज देवीदास दळवी (वय ३८) – तुळजापूर
१४. संदीप संजय राठोड (वय २२) – नळदुर्ग, ता. तुळजापूर
१५. रणजित पाटील
या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, फरार असलेल्या इतर आरोपींचाही पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणामुळे तुळजापूर आणि परिसरातील ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे उघडकीस येत असून, आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.