• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

  विनोद गंगणे! पोलिसांच्या नाकावर टिच्चून कोर्टात हजेरी, आणि पुन्हा गायब!

admin by admin
May 20, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
  विनोद गंगणे! पोलिसांच्या नाकावर टिच्चून कोर्टात हजेरी, आणि पुन्हा गायब!
0
SHARES
2.8k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांना ज्या आरोपीचा मागमूसही लागलेला नाही, तोच आरोपी चक्क कोर्टात हजेरी लावतो आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुन्हा निसटतो! ही एखाद्या मराठी थ्रिलर सिनेमाची गोष्ट वाटावी, पण हा प्रकार अगदी खराखुरा आहे आणि तो घडला आहे धाराशिव न्यायालयात.

विनोद उर्फ पिंटू गंगणे, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात पोलिसांना हवा असलेला मुख्य आरोपी. गेल्या दीड महिन्यापासून फरार असलेल्या गंगणेने 13 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास अटकपूर्व जामिनासाठी धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयीन कामकाज पार पडलं, पण… पोलिस मात्र मूकदर्शकच राहिले! गंगणेने आपली कारवाई पूर्ण केली, कोर्टातून बाहेर पडला आणि पुन्हा गायब झाला – अगदी बिनधास्तपणे!

पोलिसांवर संशयाची सावली

या प्रकारामुळे जिल्हा पोलिसांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एकीकडे आरोपी फरार असल्याचे दाखवले जाते, दुसरीकडे तोच आरोपी न्यायालयात जाऊन स्वतःहून हजेरी लावतो, आणि पोलिस त्याला अटक करत नाहीत. यामागे राजकीय हस्तक्षेप आहे का? पोलिस जानबूजून दुर्लक्ष करत आहेत का? या प्रश्नांनी आता जोर पकडला आहे.

‘पिटू’ कोण?

विनोद गंगणे उर्फ पिटू गंगणे हा  भाजपचा स्थानिक कार्यकर्ता असून, माजी नगराध्यक्ष अर्चना गंगणे यांचा पती आहे. चार दिवसापूर्वी त्याचे नाव मटका बुकी प्रकरणातही चर्चेत आलं होतं. तुळजापूरच्या अनेक राजकीय सभांमध्ये त्यांच्या ‘सदरहू’ उपस्थितीची नोंद आहे. त्यामुळेच गंगणेवर कुणाचा वरदहस्त आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु आहे.

कायदा म्हणजे निवडक बंधन?

सामान्य नागरिकाने कोर्टात उशिरा हजेरी लावली, तर वॉरंट, दंड, अटक अशा कारवाया होतात. पण इथे तर आरोपी फरार असूनसुद्धा तो कोर्टात हजेरी लावतो, तरीही पोलिस काहीही करत नाहीत! हा कायदाचाच अपमान नाही का?

सत्ताधाऱ्यांचं ‘डोळस’ मौन

गंगणे भाजपशी संबंधित असल्यामुळे सत्ताधारी गप्प आहेत. विरोधकांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत चौकशीची मागणी केली आहे. “हा काय पोलिसांचा गोंधळ आहे की गँगवॉर?” असा सवाल शिवसेना ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

गंगणेची ‘कोर्टातली शोभायात्रा’ हे कायद्याची पायमल्ली करणारे प्रकरण असून, पोलिस आणि न्यायव्यवस्थेतील सुसंवाद किंवा ‘समजूतदार’पणा उघड करणारा धक्कादायक प्रकार आहे.

“गंगणे जरी फरार असला, तरी पोलिसांची निष्ठा कुठे हरवली?”
हे जनतेला पडलेलं खऱ्या अर्थाने गंभीर आणि अस्वस्थ करणारे प्रश्न आहे.

पिटू गेला, पण पोलिसांचं ‘पावसाळी छत्री’ बिंधास्तपणे उघडं पडल्याचं चित्र मात्र स्पष्ट झालंय.

Previous Post

तुळजापुरात भाजपला ड्रग्ज आणि मटक्याचं ग्रहण; आमदारांचे ‘शिलेदार’च कायद्याच्या कचाट्यात, पक्षाची मोठी नाचक्की!

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आणखी एका फरारी आरोपीला बेड्या …

Next Post
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आणखी एका फरारी आरोपीला बेड्या ...

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group