धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन लेखापाल सुरज संपत बोर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश विश्वास मोहिते यांनी २४ नोव्हेंबर रोजी नामंजूर केला होता. त्यानंतर एसआयटी पथकाने रविवारी मध्यरात्री बोर्डे यास नगर येथून ताब्यात घेतले आहे. आज ( सोमवारी ) बोर्डे यास अटक दाखवण्यात येणार आहे.
धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या कथित अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्याकडे होता. त्यांनी कोणत्याही हालचाली न करता, आरोपीस अप्रत्यक्षात मदत केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला होता. तसेच या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, त्यात डीवायएसपी स्वप्नील राठोड , सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड यांचा समावेश आहे.
या पथकाने जलद गतीने चौकशीची चक्रे फिरवून , बोर्डे यास रविवारी मध्यरात्री नगर येथून ताब्यात घेतले आहे. आज ( सोमवारी ) बोर्डे यास अटक दाखवण्यात येणार आहे , उद्या त्यास न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.
धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी आ. सुरेश धस यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर पोलिसांना जाग आली आहे. अखेर तीन महिन्यानंतर बोर्डे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. बोर्डे याने तोंड उघडल्यास खऱ्या सूत्रधाराची नावे समोर येणार आहेत.
काय आहे प्रकरण ?
आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद , धाराशिव 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद धाराशिव येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणि विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणीवपूर्वक लेखा विभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद धाराशिव ( रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब हा.मु. समर्थ नगर धाराशिव ) यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हे आहेत दोन गुन्हे
- आरोपी नामे-1) हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, न.प. धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी 2) सुरज संपत बोर्डे, तत्कालीन लेखापाल 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.21.01.2021 ते 18.11.2022 या कालावधीत नगर परिषद धाराशिव येथे “रमाई आवास योजना”च्या खात्यावर जमा असलेले 3,14,79,000 पैकी 2,93,14,078 रुपये शिल्लक असल्याचे दिसुन येते त्यांनी मंजुर झालेल्या कामावर खर्च न करता योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणूक केली आहे.तसेच “लोकशाहीर आण्णाभाउ साठे नागरी वस्ती सुधार योजना” सन 2019-20 अन्वये प्राप्त रक्कम 3,14,79,000 ₹ पैकी 21,64,922 एवढी रक्कम योजनाबाह्य खर्च करुन शासनाची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे धंदा- नोकरी लेखापाल नगर परिषद धाराशिव , रा. मस्सा खंडेश्वरी ता. कळंब हा. मु. रा. समर्थ नगर धाराशिव यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, 409, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
- आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद , धाराशिव 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद धाराशिव येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणि विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणीवपूर्वक लेखा विभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद धाराशिव ( रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब हा.मु. समर्थ नगर धाराशिव ) यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.