• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: शुभम नेपतेच्या अटकेने खळबळ, एकूण आरोपींची संख्या ३७ वर, १७ अद्याप फरार

admin by admin
May 29, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर-  तुळजापूर शहराला हादरवून सोडणाऱ्या आणि राज्यभर गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शुभम नेपते असे या अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज विक्रेत्याचे नाव आहे. तामलवाडी पोलिसांनी बुधवारी, दि. २८ मे रोजी रात्री उशिरा तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ, भोसले गल्ली येथून त्याला ताब्यात घेतले. या अटकेमुळे प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या ३७ झाली असून, अजूनही १७ आरोपी फरार आहेत.

सविस्तर माहिती अशी की, तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये १४ फेब्रुवारी २०२५ रोजी या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला एकूण ३६ आरोपी निष्पन्न झाले होते, त्यापैकी १८ जणांना अटक करण्यात आली होती तर १८ जण फरार होते. पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात तब्बल १० हजार पानांचे दोषारोपपत्रही सादर केले आहे.

बुधवारी रात्री उशिरा सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील तामलवाडी पोलिसांच्या पथकाने शुभम नेपते या नवीन आरोपीस अटक केली. नेपते हा ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपींपैकी एक असल्याचे समजते. गेल्या आठ ते पंधरा दिवसांत अटक झालेला हा तिसरा संशयित आरोपी आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर आणि त्यांचे पथक अत्यंत नियोजनपूर्वक तपास करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ३७ आरोपी निष्पन्न केले असून, यामध्ये २६ जणांचा विक्री गटात, तर १० जणांचा सेवन करणाऱ्या गटात समावेश आहे. शुभम नेपतेच्या अटकेमुळे अटक आरोपींची संख्या १९ झाली असून, १७ आरोपी अद्याप मोकाट आहेत. फरार असलेल्या इतर आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

नूतन पोलीस अधीक्षकांकडून जनतेच्या वाढत्या अपेक्षा

या प्रकरणी पूर्वीचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची अवघ्या ९ महिन्यांत बदली झाली होती. त्यांच्या जागी नूतन पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, आज त्यांच्या कामाचा सहावा दिवस आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी यापूर्वी शहरातील सुमारे ८० जणांना तसेच काही राजकीय नेतेमंडळींनाही नोटिसा बजावल्या होत्या. आता नूतन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी या प्रकरणी नव्याने शहरातील ८० जणांना नोटिसा बजावून कसून चौकशी करावी आणि फरार आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी जोरदार मागणी तुळजापूर शहर आणि तालुक्यातून होत आहे.

Previous Post

तुळजापूर विकासाचा नवा ‘फोटोशॉप’ अध्याय? १८६५ कोटींच्या नुसत्या घोषणा की खरंच काहीतरी होणार?

Next Post

गुरुजींची ‘दिव्यांग’ लीला: बदलीसाठी थेट आजारपणाचं नाटक !

Next Post
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

गुरुजींची 'दिव्यांग' लीला: बदलीसाठी थेट आजारपणाचं नाटक !

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!