• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

admin by admin
May 30, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर  – देवदर्शनासाठी मध्यरात्री तुळजापूरकडे निघालेल्या गिर कुटुंबावर काळाने घाला घातला. काक्रंबा – वडगाव लाख (ता. तुळजापूर) रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील पोमादेवी जवळगा येथील गिर कुटुंब आपल्या खासगी मालवाहतूक टमटम (MH 24 AU 5381) मधून शिखर शिंगणापूर जाताना वाटेत तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र, वडगाव लाखजवळ चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट रस्त्यालगत असलेल्या सिमेंट पुलाला धडकली. या भीषण धडकेत गाडीचा चक्काचूर झाला.

अपघातात अवधूत अमोल गिर (वय ४ वर्ष) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमींमध्ये अमोल नरोत्तम गिर (३०), दुर्गा अमोल गिर (१९), जयश्री नरोत्तम गिर (४५), वैष्णव हणुमंत पुरी (३०), गीतांजली नरोत्तम गिर (३२), अद्विक अमोल गिर (२), व नरोत्तम प्रेम गिर (६२) यांचा समावेश आहे. सर्वजण पोमादेवी जवळगा (ता. औसा, जि. लातूर) येथील रहिवासी आहेत.

घटनास्थळी ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. १०८ रुग्णवाहिका चालक जहीद पटले आणि डॉक्टर राऊत यांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी सर्वांना धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून मृत बालकाचा मृतदेह तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे.

या अपघातात टमटमचेही मोठे नुकसान झाले आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या आनंद यात्रेचे शोकांतिका होऊन संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

व्हिडीओ पाहा

Previous Post

तुळजापूर: आईचा आक्रोश आभाळाला भिडला, पण दैवाने घात केला; खेळता खेळता चिमुकल्या समर्थचा अंत

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसात गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ; पोलिसात गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group