• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आमदार राणा पाटलांनी निवडणुकीसाठी माहिती दाबून ठेवली?

 ओमराजे निंबाळकरांचा घणाघात

admin by admin
June 4, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आमदार राणा पाटलांनी निवडणुकीसाठी माहिती दाबून ठेवली?
0
SHARES
878
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: “तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची माहिती भाजप आमदार राणा पाटील यांना वर्षभरापूर्वीच मिळाली होती, पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुका निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी त्यांनी ही माहिती दाबून ठेवली आणि ड्रग्ज माफियांना पाठीशी घातले,” असा सणसणीत आणि थेट आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. आमदार कैलास पाटील यांना सोबत घेऊन घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून आमदार राणा पाटील आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नांची सरबत्ती केली.

खासदार निंबाळकर यांनी अत्यंत आक्रमकपणे सांगितले की, “आमदार राणा पाटील यांचा कार्यकर्ता विनोद गंगणे हा ड्रग्जच्या आहारी गेल्याने त्याला डिसेंबर २०२३ मध्येच राणा पाटलांनी स्वतःच्या तेरणा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. म्हणजे त्यांना या प्रकरणाची पूर्ण कल्पना होती. मग गुन्हा दाखल होण्यासाठी १४ फेब्रुवारी २०२५ का उजाडावे लागले? एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना का दिली नाही? वर्षभर ते गप्प का होते?”

“मी लोकसभेत आणि आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला, पण ज्यांच्या मतदारसंघात हे गंभीर प्रकरण घडले, ते आमदार राणा पाटील विधानसभेत गप्प का बसले? आता प्रकरण बाहेर आल्यावर पोलिसांना टीप दिल्याचे सांगत आहेत. मग वर्षभर कुणाला वाचवत होते?” असा बोचरा सवाल निंबाळकर यांनी उपस्थित केला.

पोलिसांवरही गंभीर आरोप; ‘आका’ कोण वाचवतंय?

खासदार निंबाळकर यांनी पोलिसांच्या तपासावरही गंभीर ताशेरे ओढले. ते म्हणाले, “या प्रकरणात ३७ आरोपी निष्पन्न झाले, पण दोन महिने उलटूनही केवळ १९ जणांना अटक झाली आहे. १८ आरोपी आजही मोकाट आहेत. मुंबईची आरोपी संगीता गोळे हिने तिच्या जबाबात ‘अग्रवाल’ नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. त्याचा फोन चालू असूनही पोलीस त्याला अटक का करत नाहीत? पिटा सुर्वे यालाही अटक झालेली नाही. हे दोघे या रॅकेटचे ‘आका’ असून त्यांना नेमके कोण वाचवत आहे?”

“एवढेच नाही, तर संगीता गोळेचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला नवरा वैभव गोळे याला अटक करूनही का सोडण्यात आले? दोन लाख रुपयांचे ड्रग्ज खरेदी करणाऱ्या विनोद गंगणेला विक्रेता न दाखवता केवळ सेवन करणारा म्हणून का दाखवले? या सर्व प्रकरणावरून पोलीस मोठ्या राजकीय दबावाखाली काम करत आहेत हे स्पष्ट होते,” असेही ते म्हणाले.

या प्रकरणाची सर्व माहिती घेऊन लवकरच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेमुळे धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

एका व्यक्तीसाठी पोलिसांचा ‘द्रविडी प्राणायाम’

पोलिसांनी एका व्यक्तीला वाचवण्यासाठी संपूर्ण तपास भरकटवला असल्याचा दावा करताना निंबाळकर म्हणाले, “विनोद गंगणे याला केवळ ‘सेवन’ गटात टाकले आहे. पण याच गंगणेने एकावेळी ड्रग्जच्या ८५ पुड्या खरेदी केल्या. त्याने १ लाख ८५ हजार रुपये इतरांच्या मोबाईलवरून ड्रग्ज तस्कर संतोष खोतला पाठवले. दुसऱ्याच्या नावाचे सिमकार्ड वापरणे, हा शांत डोक्याने केलेला कट नाही का? आरोपी संतोष खोतच्याच जबाबानुसार गंगणेने २ लाख ९७ हजारांचे ड्रग्ज खरेदी केले. मग हा केवळ सेवन करणारा कसा?”

तपासातील धक्कादायक बाबी आणि पोलिसांना सवाल

१. २० पाने गायब: फरार आरोपी बापू कणे याच्या बँक खात्याचे स्टेटमेंट २४ पानांचे असताना पोलिसांनी आरोपपत्रात केवळ ४ पाने जोडली. उर्वरित २० पाने का दडपली? त्यात कोणाचे आर्थिक व्यवहार लपवले आहेत?

२. ‘आकां’ना अभय: मुंबईचा तस्कर अतुल अग्रवाल आणि सोलापूरचा पिट्या सुर्वे यांची नावे समोर येऊनही पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. अग्रवालचा फोन चालू असतानाही त्याची साधी चौकशीही नाही.

३. मुख्य गुन्हेगाराला पळायला मदत?: आरोपी संगीता गोळे हिला अटक केल्याची माहिती पोलिसांनी तिचा पती वैभव गोळे याला दिली. वैभव गोळे हा स्वतः दोन ड्रग्ज प्रकरणात आरोपी असून, माहिती मिळताच तो फरार झाला. पोलिसांनी मुख्य गुन्हेगारालाच पळून जाण्यास मदत केली का?

४. पोलीस कर्मचारीच सामील?: आरोपींच्या जबाबात काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा पोलिसांना बडतर्फ करण्याचे आश्वासन दिले होते, पण इथे साधी चौकशीही सुरू नाही.

‘संपत्ती जप्त करा, कोर्टातील भूमिकेवर लक्ष’

“फरार आरोपींना अटक झाल्यानंतरच ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. या सर्वांवर मकोको लावावा, त्यांची आणि ड्रग्जमधून कमावलेली संपत्ती जप्त करावी,” अशी मागणी खासदार निंबाळकर यांनी केली. “पोलीस आरोपींना जामिनासाठी न्यायालयात मदत करत आहेत का, यावर आमचे बारीक लक्ष आहे. तसे आढळल्यास थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू. हे ड्रग्ज रॅकेट मुळापासून नष्ट झालेच पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला.

Previous Post

धाराशिव इफेक्ट: राज्यात ‘बोगस दिव्यांग’ शोधमोहीम, शिक्षण आयुक्तांच्या एका आदेशाने बदली घोटाळेबाजांचे धाबे दणाणले!

Next Post

धाराशिवचे ‘राज’कारणी: खुर्चीसाठी खुमासदार कुस्त्या आणि ‘ड्रग्ज’दार टोलेबाजी!

Next Post
धाराशिवचे ‘राज’कारणी: खुर्चीसाठी खुमासदार कुस्त्या आणि ‘ड्रग्ज’दार टोलेबाजी!

धाराशिवचे 'राज'कारणी: खुर्चीसाठी खुमासदार कुस्त्या आणि 'ड्रग्ज'दार टोलेबाजी!

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group