• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उधारीत दाढी न केल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल

admin by admin
June 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – शहरात गुरुवारी (दि. ५ जून ) सायंकाळी उधारीवर कटिंग करण्यास नकार दिल्याने सलून कर्मचारी तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडित तरुण ऋतुराज बालाजी मोरे (वय १८) याचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून, आरोपी बबलू सूर्यवंशी याने हल्ला केल्यानंतर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे जबाबात म्हटले आहे.

पीडित ऋतुराज मोरे याने रुग्णालयातून पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, तो गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मेन रोडवरील ‘न्यू क्लासिक जेंट्स पार्लर’मध्ये काम करत होता. त्यावेळी बबलू  सूर्यवंशी (रा. सावित्रीबाई फुले सोसायटी, धाराशिव) हा दारूच्या नशेत दुकानात आला. “माझी कटिंग आता कर, मी पैसे देणार नाही, उधार कर,” असे तो म्हणाला.

ऋतुराजने त्याला, “तुमच्यापुढे तीन गिऱ्हाईक आहेत, तुमचा नंबर नंतर लागेल,” असे समजावण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने बबलूने पाठीमागून ऋतुराजला शिवीगाळ करत ढकलून दिले. त्यानंतर त्याने खिशातून लोखंडी धारदार फायटर काढून ऋतुराजच्या मानेच्या वर, डोक्याच्या मधोमध पाठीमागून जोरदार वार केला. या हल्ल्यात ऋतुराज गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला आणि त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला.

हल्ला केल्यानंतर आरोपी बबलू सूर्यवंशी एवढ्यावरच थांबला नाही. “जर तू पोलिसात तक्रार दिली, तर मी तुझ्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची अशी धमकी देऊन तो पळून गेला. पळून जाताना “मी भीमनगरचा रहिवासी आहे,” असेही तो म्हणाल्याचे ऋतुराजने जबाबात नमूद केले आहे.

घटनेनंतर दुकानातील लोकांनी ऋतुराजचा मामा आणि दुकान मालक सचिन चौधरी यांना फोन करून माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऋतुराजला शासकीय रुग्णालयात दाखल केले.

याप्रकरणी, आरोपी बबलू  सूर्यवंशी याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणाने केली आहे. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला असून, फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.

याप्रकरणी आरोपी बबलू सूर्यवंशी याच्यावर धाराशिव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ११८ ( १ ), ३५२, ३५१ ( २ ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

दत्ताभाऊ, तुम्ही ‘दत्त’ का नाही राहिलात?

Next Post

नायगावमध्ये पाण्याच्या मोटारीवरून प्राणघातक हल्ला, एकावर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नायगावमध्ये पाण्याच्या मोटारीवरून प्राणघातक हल्ला, एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026
‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!

September 10, 2026
“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

“दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

September 9, 2026

Recent Posts

  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
  • ‘जशास तसे’: राणादादांच्या लुडबुडीला तानाजी सावंतांचे सव्याज उत्तर, तुळजापुरातच केला ‘करेक्ट कार्यक्रम’!
  • “दुष्काळाच्या संकटात शेतकरी गुणवंत क्षीरसागर यांचे दुर्दैवी निधन; तानाजी सावंतांकडून कुटुंबाला आर्थिक मदत”
  • पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!