• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार! ७५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून जंगलात नेऊन मारहाण

नऊ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

admin by admin
June 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

बेंबळी  – धाराशिव तालुक्यातील करजखेडा येथे एका ७५ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचे चारचाकी गाडीतून अपहरण करून, जंगलात नेऊन जातीवाचक शिवीगाळ करत बेल्टने आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नऊ आरोपींविरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनार्दन नारायण आदटराव (वय ७५, रा. करजखेडा, ता. जि. धाराशिव) असे फिर्यादी वृद्धाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ९ मे २०२५ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पाटोदा शिवारातील जंगलात ही घटना घडली.

आरोपी शिवाजी शंकर भोसले, सुधीर बलभिम भोसले, शहाजी रामहारी भोसले, रोहीत शिवाजी भोसले, बालाजी बलभिम भोसले, पांडुरंग लिंबराज भोसले, सचिन लिंबराज भोसले, लिंबराज शंकर भोसले, आणि रोहन शिवाजी भोसले (सर्व रा. करजखेडा) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवून जनार्दन आदटराव यांना जबरदस्तीने एका चारचाकी गाडीत घातले. त्यानंतर त्यांना पाटोदा शिवारातील जंगलात नेऊन जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, बेल्टने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले.

या घटनेनंतर भयभीत झालेल्या जनार्दन आदटराव यांनी ७ जून २०२५ रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व नऊ आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १८९(३), १८९(४), १९१(१),(२), १९०, ३५२, ३५१(२), १२७(२) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(वाय) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

शेतीच्या रस्त्याच्या वादातून 77 वर्षीय वृद्धाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

काटी शिवारात गोवंश हत्या; पावणेतीन लाखांचे चामडे आणि साहित्य जप्त, एकावर गुन्हा

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

काटी शिवारात गोवंश हत्या; पावणेतीन लाखांचे चामडे आणि साहित्य जप्त, एकावर गुन्हा

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!