• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

काटी शिवारात गोवंश हत्या; पावणेतीन लाखांचे चामडे आणि साहित्य जप्त, एकावर गुन्हा

admin by admin
June 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी  – तुळजापूर तालुक्यातील काटी येथील एका शेतात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांची चामडी बाळगल्याचा प्रकार तामलवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे २ लाख ९४ हजार ६०० रुपये किमतीची २५ जनावरांची चामडी आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वजीर अंबीर कुरेशी (वय ४०, रा. काटी, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून २०२५ रोजी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास काटी येथील गट क्रमांक ११३३ मधील आरोपी वजीर कुरेशी याच्या शेतात गोवंशीय जनावरांची कत्तल होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तामलवाडी पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला.

यावेळी पोलिसांना घटनास्थळी गायी आणि वासरांची कत्तल केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथून २५ जनावरांची चामडी आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २,९४,६०० रुपये आहे.

याप्रकरणी पोलीस स्वतः सरकारतर्फे फिर्यादी झाले असून, आरोपी वजीर कुरेशी विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(बी), ५(क)(१), ९(अ) आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१)(के) अन्वये तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये धक्कादायक प्रकार! ७५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून जंगलात नेऊन मारहाण

Next Post

धाराशिवचा राजकीय आखाडा: ‘काटा किर्र’ की ‘घर करा’!

Next Post
धाराशिवच्या राजकीय आखाड्यात निधीवरून ठिणगी: राणेंच्या ‘दादा’गिरीला ओमराजेंचे जशास तसे प्रत्युत्तर!

धाराशिवचा राजकीय आखाडा: 'काटा किर्र' की 'घर करा'!

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!