• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येडशी टोल नाक्यावर पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ४२ वासरांची सुटका

पुणे जिल्ह्यातील तरुणावर गुन्हा दाखल, २.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
June 13, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयीपणे वाहतूक केल्या जाणाऱ्या ४२ गोवंशीय वासरांना जीवदान देण्यात धाराशिव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी येडशी टोल नाक्यावर सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, वासरांसह पिकअप वाहन असा एकूण २ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

धाराशिव ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवारी, ११ जून रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येडशी टोल नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी एमएच ४२ बी ४२०३ या क्रमांकाच्या संशयित पिकअप वाहनाला थांबवून तपासणी केली. वाहनाच्या मागच्या डालात अत्यंत निर्दयीपणे, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता ४२ जर्सी गायीची वासरे कोंबून भरल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी तात्काळ वाहनचालक सलमान असलम सय्यद (वय २७, रा. शहाजी नगर, बारामती रोड, इंदापूर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता, ही वासरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे उघड झाले.

याप्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी सलमान सय्यद विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सर्व ४२ वासरांची सुटका करण्यात आली असून, पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; शेतकरी हैराण, सोयाबीन, सौर पंप आणि तारा लंपास

Next Post

बेंबळीच्या डॉ. झिंगाडे यांचा प्रताप: चुकीच्या उपचाराने रुग्णाच्या जीवाशी खेळ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

Next Post
बेंबळीचे तथाकथित डॉ. सुधीर झिंगाडे यांची बोगसगिरी उघडकीस

बेंबळीच्या डॉ. झिंगाडे यांचा प्रताप: चुकीच्या उपचाराने रुग्णाच्या जीवाशी खेळ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ

September 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026

Recent Posts

  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ
  • पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!