• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप, कामाविना निधी हडपल्याचा दावा

admin by admin
June 16, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप, कामाविना निधी हडपल्याचा दावा
0
SHARES
852
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी आणि कळंब तालुक्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते भास्कर महादेव वारे यांनी केला आहे.  सन २०२४-२०२५ या कालावधीत कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या या योजनेत, प्रत्यक्षात कामे न करताच बोगस मोजमाप पुस्तिका तयार करून शासकीय निधीचा अपहार करण्यात आल्याचे वारे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

लातूरच्या कृषी सहसंचालकांना सादर केलेल्या निवेदनानुसार, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आणि मंडळ अधिकारी यांनी संगनमत करून सिमेंट नाला बांध आणि कंपार्टमेंट बंडिंगची कामे कागदोपत्री दाखवली.  प्रत्यक्षात ही कामे झालीच नसून, केवळ बनावट मोजमाप पुस्तिकांच्या आधारे शासनाची फसवणूक करण्यात आली, असा गंभीर आरोप वारे यांनी केला आहे. 

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भास्कर वारे यांनी केली आहे.  सन २०२४-२०२५ मध्ये मंजूर झालेली व चालू असलेली कामे शासकीय परिपत्रक आणि अंदाजपत्रकातील नकाशाप्रमाणे योग्य ठिकाणी झाली आहेत का, याची तपासणी करण्यासाठी तातडीने एक चौकशी समिती नेमण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. या चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करून, त्यांनी अपहार केलेली रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. 

या निवेदनाची एक प्रत माहिती व योग्य कार्यवाहीसाठी पुण्याच्या कृषी आयुक्तांनाही पाठवण्यात आली आहे. या आरोपामुळे कृषी विभागात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Previous Post

भूम शहरात धाडसी चोरी; गॅस कटरने ATM कापून पावणेनऊ लाखांची रोकड लंपास

Next Post

धरण उशाला, तरी कोरड घशाला ! नळदुर्गचा प्रशासनाविरोधात ‘गाढव’ आक्रोश

Next Post
धरण उशाला, तरी कोरड घशाला ! नळदुर्गचा प्रशासनाविरोधात ‘गाढव’ आक्रोश

धरण उशाला, तरी कोरड घशाला ! नळदुर्गचा प्रशासनाविरोधात 'गाढव' आक्रोश

ताज्या बातम्या

२० वर्षांच्या निस्सीम भक्तीला साद: धाराशिवच्या माने दांपत्याला मिळाला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान

२० वर्षांच्या निस्सीम भक्तीला साद: धाराशिवच्या माने दांपत्याला मिळाला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान

July 25, 2026
तुळजापुरात स्कोडा कारची काच फोडून १.५ लाखांची रोख रक्कम लांबवणारा चोरटा जेरबंद!

तुळजापुरात स्कोडा कारची काच फोडून १.५ लाखांची रोख रक्कम लांबवणारा चोरटा जेरबंद!

July 24, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे सोन्याचे मिनी गंठण लांबवले!

July 24, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

July 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

दारुड्यांच्या भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि दगडफेक

July 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!