• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धरण उशाला, तरी कोरड घशाला ! नळदुर्गचा प्रशासनाविरोधात ‘गाढव’ आक्रोश

admin by admin
June 16, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
धरण उशाला, तरी कोरड घशाला ! नळदुर्गचा प्रशासनाविरोधात ‘गाढव’ आक्रोश
0
SHARES
239
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग: अवघ्या तीन किलोमीटरवर असलेले बोरी धरण तुडुंब भरलेले असताना, नळदुर्ग शहराला मात्र पंधरा दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे. दुसरीकडे, ३५ किलोमीटर दूर असलेल्या तुळजापूरला याच धरणातून नियमित पाणीपुरवठा होत आहे. प्रशासनाच्या या अजब कारभाराला आणि दुजाभावाला कंटाळलेल्या संतप्त नळदुर्गकरांनी सोमवारी थेट नगर परिषदेवर ‘गाढव मोर्चा’ काढून आपला रोष व्यक्त केला.

ऐतिहासिक किल्ला गेटपासून निघालेल्या या आगळ्यावेगळ्या मोर्चात प्रशासनाच्या नावाने घोषणाबाजी करत नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, एका गाढवाच्या गळ्यात ‘मुख्याधिकारी’ नावाचा फलक अडकवून, जणू काही सुस्त प्रशासनाचीच धिंड काढली जात होती. क्रांती चौक, बसवेश्वर चौक मार्गे नगर परिषदेवर धडकलेल्या या मोर्चात नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर शाब्दिक प्रहार केले.

“धरण भरलेलं आहे, पण आमच्या नळाला पाणी नाही. हा कुठला न्याय?” असा संतप्त सवाल प्रमोद कुलकर्णी, ज्योतिबा येडगे, मुन्ना शेख,अझहर जहागीरदार, शिवाजी गायकवाड, संतोष पुदाले, सतीश पुदाले, मुकुंद नाईक, अमीर शेख, शहाबाज काझी,दगडू डुकरे, कमलाकर चव्हाण यांच्यासह अनेक आंदोलकांनी केला. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि दिवाबत्ती या मूलभूत सुविधा न मिळाल्यास पालिकेला कुलूप ठोकून राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ करण्याचा खणखणीत इशाराही यावेळी देण्यात आला.

प्रशासनाचा सारवासारवीचा पाढा

नागरिकांचा संताप अनावर झाल्यानंतर पालिका प्रशासनाने नेहमीप्रमाणे सारवासारव केली. प्रभारी मुख्याधिकारी महोदय बैठकीचे कारण देत मोर्चाला सामोरे आलेच नाहीत. प्रशासनाने १९८० सालची जुनाट पाणीपुरवठा योजना, अमृत २.० योजनेचे रखडलेले काम आणि महावितरणच्या विजेचा लपंडाव यांसारख्या समस्यांचा पाढा वाचून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, आंदोलकांच्या रेट्यापुढे झुकत प्रशासनाने लेखी आश्वासन दिले.

मात्र, ‘धरण जवळ असूनही पाणी का नाही?’ या मूळ प्रश्नाचे ठोस उत्तर गुलदस्त्यातच राहिले. त्यामुळे, लेखी आश्वासन मिळूनही नळदुर्गकरांच्या घशाची कोरड कधी मिटणार, हा प्रश्न कायम आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप, कामाविना निधी हडपल्याचा दावा

Next Post

दुधाळवाडीचा ‘शिक्षण द्या, कर विसरा’ पॅटर्न!

Next Post
दुधाळवाडीचा ‘शिक्षण द्या, कर विसरा’ पॅटर्न!

दुधाळवाडीचा 'शिक्षण द्या, कर विसरा' पॅटर्न!

ताज्या बातम्या

२० वर्षांच्या निस्सीम भक्तीला साद: धाराशिवच्या माने दांपत्याला मिळाला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान

२० वर्षांच्या निस्सीम भक्तीला साद: धाराशिवच्या माने दांपत्याला मिळाला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान

July 25, 2026
तुळजापुरात स्कोडा कारची काच फोडून १.५ लाखांची रोख रक्कम लांबवणारा चोरटा जेरबंद!

तुळजापुरात स्कोडा कारची काच फोडून १.५ लाखांची रोख रक्कम लांबवणारा चोरटा जेरबंद!

July 24, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे सोन्याचे मिनी गंठण लांबवले!

July 24, 2026
पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; १६.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

July 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

दारुड्यांच्या भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि दगडफेक

July 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!