• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये फीसाठी विद्यार्थिनीचा अपमान; पालकाची शिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव

admin by admin
June 17, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव : अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये फीसाठी विद्यार्थिनीचा अपमान; पालकाची शिक्षण अधिकाऱ्यांकडे धाव
0
SHARES
2.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शहरातील अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला फी भरण्यास उशीर झाल्याने अपमानास्पद वागणूक देऊन शाळेतून घरी पाठवण्यात आल्याचा आरोप करत तिच्या पालकाने शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. 

अर्जदार सचिन हरिश्चंद्र मोरे यांनी शिक्षण अधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, धाराशिव यांच्याकडे ही लेखी तक्रार केली आहे.  मोरे यांची मुलगी, वेदिका सचिन मोरे, अभिनव इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत आहे. शाळेची फी भरण्यास विलंब झाल्याने त्यांना शाळेतून फोन आला होता.  त्यावेळी त्यांनी दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १८ जून २०२५ रोजी फी भरण्याचे आश्वासन दिले होते. 

तरीही, त्यांच्या मुलीला अपमानास्पद वागणूक देऊन वर्गाच्या बाहेर काढण्यात आले आणि तिला घरी घेऊन जाण्यास सांगण्यात आले, असे मोरे यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. 

शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही विद्यार्थ्याला अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देता येत नाही किंवा वर्गाबाहेर काढता येत नाही, असे असतानाही अभिनव इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापन असे प्रकार वारंवार करत असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.  त्यांच्या मुलीसोबत इतरही अनेक विद्यार्थ्यांना सर्वांसमोर वर्गात किंवा स्टेजवर उभे करून अपमानित केले जाते, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 

या प्रकरणी, शाळेच्या व्यवस्थापनाला योग्य ती समज देऊन त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी विनंती सचिन मोरे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली आहे.  शिक्षण विभागाने १७ जून रोजी हे तक्रारपत्र स्वीकारले आहे. 

Previous Post

दुधाळवाडीचा ‘शिक्षण द्या, कर विसरा’ पॅटर्न!

Next Post

धाराशिव: जमिनीच्या वादातून चेकचा गैरवापर, दोघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: जमिनीच्या वादातून चेकचा गैरवापर, दोघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group