तुळजापूर : एकत्रित घेतलेल्या जमिनीवर प्लॉट विक्रीच्या संमती पत्रावर सही कर म्हणून तगादा लावल्याने एका वृद्ध इसमाने विषारी गोळ्या घेवून आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सतीश गंगाराम कदम,( वय 73 वर्षे, रा. भगवती विहीरीजवळ ) यांनी दि.24.11.2023 रोजी 13.33 ते दि. 25.11.2023 रोजी 14.00 वा. सु. विषारी गोळ्या घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- 1) किसन भाउराव डोंगरे, 2) गणेश उर्फ गणराज किसन डोंगरे, 3) नागेश सिन डोंगरे सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी मयत सतीश कदम व त्यांच्या मुलाची भेट घेवून एकत्रित घेतलेल्या जमिनीवर प्लॉट विक्रीच्या संमती पत्रावर सही करा असे म्हणून मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून सतीश कदम यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- प्रसाद सतिश कदम, वय 30 वर्षे, रा. भगवती विहीरीजवळ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
वाशी : आरोपी नामे- 1) ज्ञानेश्वर सोपान गिते, 2) श्रीरंग ज्ञानोबा गिते, 3) अशोक केशव चव्हाण तिघे रा. आद्रुंड ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.27.11.2023 रोजी 22.00 वा. सु. भगवान भोईटे यांचे घराजवळ ईट जातेगाव रोडवर आद्रुंड येथे फिर्यादी नामे-सिध्देश्वर सदाशिव लिमकर, वय 43 वर्षे, रा. आद्रुंड ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने राजकारणाच्या कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सिध्देश्वर सदाशिव लिमकर यांनी दि.30.11.2023 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 307, 324, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : आरोपी नामे- 1) उमेश गणपत शिनगारे, रा. वाणेवाडी, ता. तुळजापूर 2) शिवानंद (पुर्ण नाव माहित नाही) रा. सावरगाव, ता. तुळजापूर व इतर अनोळखी दोन इसम यांनी दि.30.11.2023 रोजी 15.00 वा. सु. वाणेवाडी येथे शेत गट नं 160 मध्ये फिर्यादी नामे-सागर राजेंद्र काटकर, वय 28 वर्षे, रा. वाणेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने बांधावरील गवत काढण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने, मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सागर काटकर यांनी दि.30.11.2023 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.