कळंब : फिर्यादी नामे-महादेव मनोहरराव घुले, वय 60 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. कळंब, जि. धाराशिव यांचे तांदुळवाडी रोड लगत रुणवाल बिल्डींग डिकसळ ता. कळंब येथील सुपारीचे गोडवुनचे शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.01.12.2023 रोजी 05.00 ते दि. 02.12.2023 रोजी 07.00 वा. सु.तोडून आत प्रवेश करुन गोडावून मधील सुपारीचे 45 पोते एकुण 16,60,125 ₹ किंमतीचा माल चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव घुले यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- अब्दुल गफार गुलाम रसुल शेख, वय 48 वर्षे, रा. खॉजानगर गल्ली धाराशिव यांचे मार्केट यार्ड येथील ऑफीस समोर धाराशिव येथुन दि. 02.12.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने बॅटरी बॉक्स मधुन पावर बॉस कंपनीचे 2 नग अंदाजे 30,000₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अब्दुल गफार गुलाम रसुल शेख यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर : फिर्यादी नामे-मोईन ईसाक शेख, वय 27 वर्षे,रा. जिजामाता नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 4,80,000₹ किंमतीची ट्रक क्र एमएच 07 सी. 6391 लाल रंगाची ही दि. 27.10.2023 रोजी 19.45 ते दि. 27.10.2023 रोजी 23.00 वा. सु. धाराशिव ते लातुर जाणारे बायपास येथील निळृया रंगाच्या पत्रयाच्या शेडच्या जवळ रोडवर तुळजापूर शिवार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मोईन शेख यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
मुरुम : आरोपी नामे- 1) बालजी केरबा सरवदे, 2)धनराज केरबा सुरवसे, 3) बालाजी लिंबु उकरंडे, 4) धनराज केरबा सुरवसे, 5)विकास बिराजदार, सर्व रा. तुगांव ता. उमरगा जि. धाराशिव 6) शुभांगी कृष्णा खंदाळे आरोग्य नगरी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.29.11.2023 रोजी 20.00 वा. सु. तुगांव ताप. उमरगा जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-कृष्णा दत्ता खंदाळे, वय 24 वर्षे, रा. रा. आरोग्य नगरी कानउे हॉस्पीटल जवळ उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमवून कौटुंबिक वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी सळई व काठीने डावे पायाचे घोटयावर मारुन गंभीर जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- कृष्णा खंदाळे यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 326, 324, 323, 504, 506, 342, 143, 144, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.