• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, April 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: डुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात, रोड रोलरला धडकून महिलेचा मृत्यू

admin by admin
July 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी
0
SHARES
3.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  शहरातील जुना उपळा रोडवर डुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात भरधाव स्कुटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रोड रोलरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात ३५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. , याप्रकरणी स्कुटी चालकावर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुनम स्वप्निल कोकाटे (वय ३५, रा. सिध्दीविनायक अपार्टमेंट, शांतीनिकेतन कॉलनी, धाराशिव) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत पुनम कोकाटे या त्यांचे दीर संदीप दिलीप कोकाटे यांच्यासोबत स्कुटीवरून (क्र. एमएच २५ बीडी ७८३५) जात होत्या. शांतीनिकेतन कॉलनीतील जुना उपळा रोडवर समोर अचानक डुक्कर आल्याने, त्याला वाचवण्याच्या नादात चालक संदीप कोकाटे यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची स्कुटी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रोड रोलरला जाऊन धडकली.

या अपघातात मागे बसलेल्या पुनम कोकाटे या गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी मयत पुनम यांचे पती स्वप्निल दिलीप कोकाटे (वय ४०) यांनी ७ जुलै रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून, हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक संदीप दिलीप कोकाटे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६, १२५(अ), आणि १२५(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

बेंबळीजवळ मोटारसायकल अपघात, एकाचा मृत्यू; निष्काळजी चालकावर गुन्हा दाखल

धाराशिव – महाळंगी ते आंबेवाडी रस्त्यावर निष्काळजीपणे मोटारसायकल चालवल्याने झालेल्या अपघातात एका ३४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात मोटारसायकल चालक स्वतःही जखमी झाला असून, त्याच्यावर बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल पांडुरंग कुदळे (वय ३४, रा. सारोळा, ता. जि. धाराशिव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चालक बापु गणपती सावंत (रा. चिखली, ता. जि. धाराशिव) याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  बापु सावंत हा विशाल कुदळे याला आपल्या मोटारसायकलवर (क्र. एमएच २५ बीसी ५८२६) बसवून महाळंगी-आंबेवाडी रस्त्यावरून जात होता. यावेळी आंबेवाडी शिवारात त्याने हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालवल्याने अपघात झाला. या अपघातात मागे बसलेला विशाल कुदळे गंभीर जखमी होऊन मयत झाला, तर चालक बापु सावंत हा देखील जखमी झाला.

याप्रकरणी मृत विशाल याचे भाऊ अमर पांडुरंग कुदळे यांनी ७ जुलै रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालक बापु सावंत विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६ आणि १२५(अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.

निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवणे जीवावर बेतले; चारीत पलटी होऊन चालकाचा मृत्यू

अनाळा येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चारीत ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, याप्रकरणी मृत चालकावरच अंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिपक दत्तु खराडे (रा. बोरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे मृत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दिपक खराडे हे आपला ट्रॅक्टर (क्र. एमएच ४५ एस १०९१) हयगयीने व निष्काळजीपणे चालवत होते. अनाळा गावातील राहुल जाधव यांच्या घरासमोरून जात असताना, पाणी जाण्यासाठी खोदलेल्या चारीमध्ये त्यांचा ट्रॅक्टर पलटी झाला. यात ते ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगमध्ये अडकून गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी सचिन बिरमल तरंगे (वय ३५, रा. भालेवाडी, ता. करमाळा) यांनी ७ जुलै रोजी अंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून, मृत चालक दिपक खराडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि १०६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अंबी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

तुळजापूर: शेत वाटणीच्या वादातून चाकू-दगडाने मारहाण; एकावर गुन्हा दाखल

Next Post

कुंथलगिरी तीर्थक्षेत्री मुंबईतील दोन वृद्ध महिलांना लुटले; पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कुंथलगिरी तीर्थक्षेत्री मुंबईतील दोन वृद्ध महिलांना लुटले; पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये डॉल्बीचा दणदणाट भोवला; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ४२ डीजे मालक व आयोजकांवर गुन्हे दाखल

जयंती मिरवणुकीत कर्णकर्कश ‘डीजे’चा दणदणाट; आयोजकांसह जालना, पुणे, सोलापूरच्या साऊंड मालकांवर ३ गुन्हे दाखल

April 17, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; सोनेगावमध्ये घरफोडी, तर अणदूर येथून दुचाकी लंपास

April 17, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जुन्या भांडणाच्या कुरापतीतून तुरोरीत बाप-लेकाला बेदम मारहाण; ५ जणांवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल

April 17, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

‘आमच्याबद्दल का सांगितले?’ या रागातून सास्तूरमध्ये संपूर्ण कुटुंबावर जीवघेणा हल्ला; अपंग बहिणीलाही मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

April 17, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याच्या कामात ६ लाखांच्या खंडणीसाठी महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; वाशी पोलिसांत चौघांवर गुन्हा

April 17, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group