तुळजापूर – तुळजापूर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतींचे आगामी २०२५-३० सालासाठी सरपंचपदाचे आरक्षण येथील पंचायत समिती सभागृहात नुकतेच काढण्यात आले. या सोडतीनंतर मंगरूळ, तामलवाडी, काटी आणि माळुंब्रा यांसारख्या प्रमुख गावांचे सरपंचपद सर्वसाधारण झाल्याने राजकीय चुरस वाढली आहे. त्याचवेळी अणदूर, सिंदफळ आणि मसला खुर्द ही पदे सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव झाली आहेत
उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख आणि तहसीलदार अरविंद बोळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पालिका शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी शिवन्या देवकर हिच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.
आरक्षण सोडतीनंतर काही ठिकाणी उत्साहाचे वातावरण असताना, आपसिंगा गाव नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) आणि काक्रंबा अनुसूचित जाती (स्त्री) साठी आरक्षित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. तालुक्यातील कसई हे एकमेव गाव अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
प्रवर्गनिहाय आरक्षित ग्रामपंचायतींची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे:
- सर्वसाधारण (एकूण ३० जागा):
आरबळी, बारूळ, बोरसवाडी नळ, धोत्री, फुलवाडी, गंधोरा, गुंजेवाडी, कदमवाडी, कुंभारी, माळुंब्रा, मुर्दा, पांगरदरवाडी, पिंपळा बुद्रुक, पिंपळा खुर्द, बाभळगाव, चिकुंडा, हिप्परगा ताड, होणाळा, काळेगाव, काटी, मंगरूळ, नंदगाव, सारोळा, शिरगापूर, तामलवाडी, आरळी खुर्द, खडकी, खुदावाडी, येडोळा, येवती.
- सर्वसाधारण स्त्री (एकूण ३० जागा):
बसंतवाडी, बोळेगाव, हगळूर, हंगरगा नळ, होर्टी, काडगाव, केमवाडी, केशेगाव, मानेवाडी, मसला खुर्द, निलेगाव, सलगरा दि., शहापूर, अणदूर, भातंब्री, बोरगाव, देवकुरुळी, देवसिंगा नळ, देवसिंगातूळ, धनेगाव, ईटकळ, जळकोट, सांगवी काटी, सांगवी मार्डी, सिंदफळ, उमरगा चिक्री, वाणेगाव, बिजनवाडी, सिंदगाव, सुरतगाव.
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (एकूण १२ जागा):
आरळी बुद्रुक, जळकोटवाडी, कात्री, खानापूर, खंडाळा, सलगरा मट्टो, सावरगाव, तोर्थ बुद्रुक, वडगाव देव, वडगाव काटी, वडगाव लाख, वानेवाडी.
- नागरिकांचा मागास प्रवर्ग – स्त्री (एकूण १५ जागा):
अपसिंगा, बोरी, चव्हाणवाडी, धनगरवाडी, बेकनरी, गुजनूर, हंगरगा तूळ, कारला, कुंसावळी, लोहगाव, मोर्डा, नांदुरी, सरडेवाडी, शिराढोण, वडाचा तांडा.
- अनुसूचित जाती (एकूण ९ जागा):
चिवरी, चिंचोली, दीपक नगर, दहिवडी, कामठा, रामतीर्थ, रायखेल, सराटी, वागवी.
- अनुसूचित जाती – स्त्री (एकूण ९ जागा):
अमृतवाडी, आलियाबाद, गोंधळवाडी, गुळहळ्ळी, जळकोट वाडी, जवळगा मेसाई, करऊंचा, तीर्थ खुर्द, दिंडेगाव.
- अनुसूचित जमाती (एकूण १ जागा):
कसई.