• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यात पोलिसांचे सोंग घेऊन ज्येष्ठ महिलेची लाखोंची फसवणूक

admin by admin
July 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे
0
SHARES
278
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा  – उमरगा शहरात पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवून एका ज्येष्ठ महिलेला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘या परिसरात एका महिलेचा खून झाला आहे, तुम्ही एवढे सोने घालून फिरू नका,’ असे घाबरवून चोरट्यांनी महिलेच्या नकळत तिच्या पर्समधून तब्बल साडेआठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मुगळे हॉस्पिटलजवळ घडली.

याप्रकरणी क्रांती भगवान कांबळे (वय ५६, रा. मूकबधिर शाळेजवळ, माने नगर, उमरगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रांती कांबळे या शुक्रवारी सायंकाळी मुगळे हॉस्पिटलच्या कंपाऊंड वॉलजवळून जात होत्या. यावेळी अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. ‘हम पोलीस वाले है,’ असे सांगत त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवले. ‘इथे एका बाईचा खून झाला आहे. तुमच्या सुरक्षेसाठी आमची इथे ड्युटी लावली आहे, तुम्ही अंगावर एवढे सोने घालू नका,’ असे त्यांनी कांबळे यांना बजावले.

चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कांबळे यांनी आपल्या गळ्यातील गंठण आणि हातातील पाटल्या असे एकूण साडेआठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने काढून आपल्या पर्समध्ये ठेवले. याचवेळी चोरट्यांनी हातचलाखीने त्यांच्या नकळत पर्समधील दागिने काढून घेतले आणि तेथून पसार झाले. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळे यांनी शनिवारी (दि. २६) उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

क्रांती कांबळे यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी अशा भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

धाराशिव : मन सुन्न करणारी घटना! दुसऱ्या पतीसाठी पोटच्या गोळ्याला १० हजारात विकले

Next Post

हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके मारहाण प्रकरण: अखेर सहा जणांवर गंभीर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापूरमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, मारहाण करून रस्त्यावर फेकले

हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके मारहाण प्रकरण: अखेर सहा जणांवर गंभीर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सोलर अन् पवनचक्कीचे साहित्य चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १० गुन्हे उघड

धाराशिवमध्ये सोलर अन् पवनचक्कीचे साहित्य चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १० गुन्हे उघड

June 7, 2026
YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group