• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा: आर्थिक वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दोन्ही गटांतील दहा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

admin by admin
August 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
945
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: येथील नारंगवाडीमध्ये आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून दोन गटांमध्ये सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारींवरून उमरगा पोलीस ठाण्यात एकूण दहा जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नारंगवाडी येथील संध्या बारसमोर घडली.

पहिल्या घटनेत, फिर्यादी अभिमन्यू उर्फ पिंटू रामराव जाधव (वय ४८, रा. नारंगवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विजय कोंडीबा शेळके (रा. नारंगवाडी), मुक्ताजी भोसले, सदानंद साठे, अमोल साठे आणि दयानंद साठे (सर्व रा. मातोळा, ता. औसा) यांनी आर्थिक वादातून गैरकायद्याची मंडळी जमवली. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून उमरगा पोलिसांनी विजय शेळके यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

त्याचवेळी, दुसऱ्या गटाचे विजय कोंडीबा शेळके (वय ४१, रा. नारंगवाडी) यांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी अभिमन्यू रामराव जाधव, कृष्णा जाधव, सुधीर प्रभाकर जाधव, सागर दगडू जाधव आणि सदाशिव आष्टे (सर्व रा. नारंगवाडी) यांनी संगनमत करून त्यांना आर्थिक व्यवहारातून शिवीगाळ केली. तसेच, काठी, दगड आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

दोन्ही गटांनी २ ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून, उमरगा पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२),(३), १८९(२), १९१(२),(३), आणि १९० अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. एकाच घटनेत दोन्ही गटांवर गुन्हे दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

वाशी : माहेरहून पैसे आणण्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीवर गुन्हा दाखल

Next Post

वाशी: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील ११ जणांकडून चौघांना मारहाण; गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

वाशी: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील ११ जणांकडून चौघांना मारहाण; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट: एकाच दिवशी चोरीचे ४ गुन्हे दाखल

March 5, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भावाशी भांडण का केले? जाब विचारणाऱ्याला बेदम मारहाण; ५० हजारांची रोकड पळवली

March 5, 2026
शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group