शिराढोण – आरोपी नामे- 1) प्रसाद क्षिरसागर- बाळी, 2) राजेंद्र उर्फ राज रविंद्र चव्हाण, 3) विजय चव्हाण तिघे रा. खुनेश्वर ता. मोहोळ जि. सोलापूर यांनी दि.26.11.2023 रोजी ते दि. 29.11.2023 रोजी 10.00 वा. सु. शिराढोण शिवारातील आवधुत टेळे यांचे शेतात फिर्यादी नामे- लतीफ बशीर अहमद शेख, वय 33 वर्षे, व्यावसाय – व्यापारी, रा कमरोद्दीनपूर ता. देवणी जि. लातुर यांनी आवधुत टेळे यांचे कडुन कलिंगड हे फळ विकत घेवून ते विक्री करण्यासाठी हैद्राबाद येथे नेहण्यासाठी नमुद आरोपींचे आयशर टॅम्पो 1) क्र एमएच 24 ए.यु. 8376, 2)एमएच 13 सी यु 7065 या दोन्ही टॅम्पोमध्ये कलिंगड भरुन हैद्राबाद येथे पोहोच करतो असे म्हणून घेवून गेले. व फिर्यादी यांचे कलिंगड फळ हे हैद्राबाद येथे पोहोच केले नसुन फिर्यादीची 2,84,920₹ ची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी- लतीफ बशीर अहमद शेख, वय 33 वर्षे, व्यावसाय व्यापारी रा कमरोद्दीनपूर ता. देवणी जि. लातुर यांनी दि.14.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 419, 420, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरीचे दोन गुन्हे दाखल
धाराशिव : फिर्यादी नामे-शैनाजबी निसार पठाण, वय 52 वर्षे, रा. अंबोहोळ ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 14.12.2023 रोजी 21.00 वा. सु. दि. 15.12.2023 रोजी 03.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडीकपाटातील रोख रक्कम 12,000₹, सोन्या चांदीचे दागिने असा एकुण 97,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शैनाजबी निसार पठाण यांनी दि.15.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-खंउु लक्ष्मण व्होनमाने, वय 52 वर्षे, रा. किणी ता. अक्कलकोट जि. सोलापूर यांची अंदाजे 10,000₹ किंमतीची काळ्या रंगाची निळा पट्टा असलेली हिरो होंन्डा स्प्लेंन्डर प्लस मोटरसायकल क्र एमएच 13 ए. बी. 8108 ही दि. 13.12.2023 रोजी रात्री 10.30 ते 11.45 वा. सु. अणदुर येथील खंडोबा मंदीरच्या बाजूला गुजनुर रोडवरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-खंडु व्होनमाने यांनी दि.15.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.