तुळजापूर : तालुक्यातील कात्री शिवारात एका शेतावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकली असा एकूण १ लाख १७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल रमेश निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही कारवाई कात्री येथील उमेश देशमुख यांच्या शेतातील एका शेडच्या बाजूला करण्यात आली. येथे काही व्यक्ती पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
- नेताजी संपतराव देशमुख, वय ४६ वर्षे
- श्रीकांत हनुमंत देशमुख, वय ४८ वर्षे
- नितीन दशरथ गोडेगीरे, वय ३६ वर्षे
- गणेश दिलीप कांबळे, वय २५ वर्षे
- रामेश्वर चंदर शिंदे, वय ३५ वर्षे
- विशाल अंकुश देशमुख, वय २९ वर्षे
सर्व आरोपी कात्री, ता. तुळजापूर येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २,१५0 रुपये रोख रक्कम, विविध कंपन्यांचे सहा मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींमध्ये एम एच ४२ एल ८६५४ , एम एच २५ ए एम २२७४ , आणि एम एच २५ बी सी ०४३० क्रमांकाच्या गाड्यांचा समावेश आहे.
याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३२१/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.