• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कात्री येथे जुगार अड्ड्यावर धाड, सहा जणांना अटक; १.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
August 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाखरवाडीच्या समाज मंदिरातच जुगाराचा अड्डा; ढोकी पोलिसांच्या छाप्यात नऊ जण ताब्यात
0
SHARES
479
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : तालुक्यातील कात्री शिवारात एका शेतावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकली असा एकूण १ लाख १७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल रमेश निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही कारवाई कात्री येथील उमेश देशमुख यांच्या शेतातील एका शेडच्या बाजूला करण्यात आली. येथे काही व्यक्ती पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या कारवाईत पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

  • नेताजी संपतराव देशमुख, वय ४६ वर्षे 
  • श्रीकांत हनुमंत देशमुख, वय ४८ वर्षे 
  • नितीन दशरथ गोडेगीरे, वय ३६ वर्षे 
  • गणेश दिलीप कांबळे, वय २५ वर्षे 
  • रामेश्वर चंदर शिंदे, वय ३५ वर्षे 
  • विशाल अंकुश देशमुख, वय २९ वर्षे 

सर्व आरोपी कात्री, ता. तुळजापूर येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण २,१५0 रुपये रोख रक्कम, विविध कंपन्यांचे सहा मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींमध्ये एम एच ४२ एल ८६५४ , एम एच २५ ए एम २२७४ , आणि एम एच २५ बी सी ०४३०  क्रमांकाच्या गाड्यांचा समावेश आहे.

याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३२१/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Previous Post

धाराशिवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

ऑनलाइन गेमिंगचे अमिष महागात, तुळजापूरच्या पिता-पुत्राला १७ लाखांचा गंडा!

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

ऑनलाइन गेमिंगचे अमिष महागात, तुळजापूरच्या पिता-पुत्राला १७ लाखांचा गंडा!

ताज्या बातम्या

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानंतर दोन नर्सेसना विषबाधा

July 12, 2026
मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

मल्हार पाटील-दत्ताभाऊ कुलकर्णी भेटीवर राजकीय चर्चा; सोमनाथ गुरव यांची ‘गाठीभेटी’ पोस्ट चर्चेत

July 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

July 12, 2026
पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

पंढरीची वारी आपणास काय शिकवते?

July 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group