• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, November 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मोहा गावात स्मशानभूमीच्या वादातून दोन गटात भीषण मारामारी; १२० जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

admin by admin
August 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब –  तालुक्यातील मोहा येथे गावठाण जमिनीतील स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून दोन गटांमध्ये भीषण मारामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रमेश मक्कल काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात तब्बल १२० जणांविरोधात जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जाळपोळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मोहा शिवारातील गट क्रमांक ५२९ मधील गावठाण जमिनीवर घडली. फिर्यादी रमेश मक्कल काळे (वय ५४) यांच्यासह सुनिल बापु काळे, बाबई शहाजी काळे, सोजरबाई बालाजी काळे, आणि जिजाबाई गुलाब काळे हे स्मशानभूमीच्या जागेजवळ असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवली.

आरोपी संदीप गौतम मडके, दयानंद अर्जुन मडके, विजय अर्जुन मडके यांच्यासह १२० जणांच्या जमावाने फिर्यादी आणि त्यांच्या सोबतच्या लोकांना जातीवाचक शिवीगाळ करत, “तुम्हाला येथे जागा मिळणार नाही,” असे म्हणून लाथाबुक्यांनी आणि दगडांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी व इतर जण जखमी झाले आहेत. इतकेच नाही, तर आरोपींनी फिर्यादीच्या मालकीची मोटरसायकल जाळून मोठे नुकसान केले.

या घटनेनंतर रमेश काळे यांनी २७ ऑगस्ट रोजी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १२० जणांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९०, ३२६(जी) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (ॲट्रॉसिटी) कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवचे ‘पावशेरसिंह’! प्रकरण ३ – विषय बदलासाठी ‘विकासाचा वायफाय २.०’

Next Post

चिवरी गावात ग्रामपंचायत ठरावावर सही करण्याच्या वादातून दोघांना जबर मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

चिवरी गावात ग्रामपंचायत ठरावावर सही करण्याच्या वादातून दोघांना जबर मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शहरात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक मोहीम

November 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

 निष्काळजीपणे गॅस शेगडी वापरून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल

November 21, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शेत रस्त्यावर माती पसरवल्याचा जाब विचारल्याने ६६ वर्षीय वृद्धासह पुतण्याला काठी व दगडाने बेदम मारहाण

November 21, 2026
एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर

एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर

November 21, 2026
कळंब – चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप

ज्ञानराज चौगुले, अनिल जगताप यांच्या न्यायालयीन लढ्याला यश!

November 20, 2026

Recent Posts

  • धाराशिव : शहरात मटका अड्ड्यांवर पोलिसांची धडक मोहीम
  •  निष्काळजीपणे गॅस शेगडी वापरून जीव धोक्यात घातल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल
  • धाराशिव : शेत रस्त्यावर माती पसरवल्याचा जाब विचारल्याने ६६ वर्षीय वृद्धासह पुतण्याला काठी व दगडाने बेदम मारहाण
  • एआय (AI) क्षेत्रातील ‘आर्थिक फुगा’ फुटण्याच्या उंबरठ्यावर
  • ज्ञानराज चौगुले, अनिल जगताप यांच्या न्यायालयीन लढ्याला यश!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!