• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवचा ‘अवतार’ वाघोबा… नेटकरी म्हणाले, “अंबानींना सांगा, घेऊन जातील ‘वनतारा’ला!”

admin by admin
September 4, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये पुन्हा वाघाचे दर्शन, वरवंटी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये घबराट
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

मंडळी, धाराशिवच्या ‘टुरिस्ट वाघोबा’ची गोष्ट तर तुम्हाला माहीत आहेच. यवतमाळहून ५०० किलोमीटरची सोलो ट्रिप मारून आलेला हा पठ्ठ्या, गेल्या आठ महिन्यांपासून जिल्ह्याचा जणू जावईच बनून राहिला आहे. त्याचा ‘फूड ब्लॉग’ अजूनही सुरूच असून, शंभराहून अधिक जनावरांच्या ‘डिशेस’वर त्याने ताव मारला आहे. पण आता या गोष्टीत नवे आणि रंजक ट्विस्ट आले आहेत!

आपल्याला आठवतंय, या महाशयांना पकडण्यासाठी आधी ताडोबाची ‘स्पेशालिस्ट’ टीम आली आणि २५ दिवसांची ‘जंगल सफारी’ करून परत गेली. त्यानंतर पुण्याची ‘हाय-टेक’ टीम आली, पण महिनाभर शोध घेऊनही वाघोबाने त्यांना गुंगारा दिला. तो ‘आज येथे, उद्या तेथे’ करत येडशी, बार्शी, भूम फिरतच राहिला.

आणि आज, ४ सप्टेंबर! वाघोबांनी वरवंटी शिवारात शेतकऱ्यांना ‘स्पेशल दर्शन’ दिले. शेतकरी घाबरले, पण कुठेतरी त्यांनाही आता सवय झाली असावी. “आले का पाव्हणे?” असं म्हणत त्यांनी वन विभागाला फोन लावला. वन विभागाची गाडी सायरन वाजवत पोहोचतेय, तोपर्यंत पठ्ठ्याने कामठा, कात्री, आपसिंगा असा पुढचा दौरा सुरू केला होता.वन विभागाचे कर्मचारी आता डायरीत रोज एकच नोंद करत असतील, “वाघोबा पुन्हा दिसले, आम्ही मागे पळालो, वाघ पुन्हा गायब!”

वन विभागाची ही सगळी धावपळ आणि वाघोबाचा ‘लपंडाव’ पाहून सोशल मीडियावर मात्र मीम्सचा पूर आला आहे. नेटकऱ्यांनी यावर एक भन्नाट आणि तितकाच विनोदी उपाय सुचवला आहे.

सध्या सोशल मीडियावर मेसेज फिरत आहेत की, “वन विभागाला आठ महिन्यांपासून वाघ सापडत नाहीये. कुणीतरी अंबानींना सांगा, ते एका दिवसात शोधून त्याला थेट जामनगरच्या ‘वनतारा’मध्ये स्पेशल ट्रीटमेंट द्यायला घेऊन जातील!”

हा मेसेज तुफान व्हायरल होत असून, लोक यावर भरपूर विनोद करत आहेत. थोडक्यात काय, तर धाराशिवचा हा वाघ आता फक्त जंगलाचा राजा राहिलेला नाही, तर सोशल मीडियाचाही ‘किंग’ बनला आहे. एका बाजूला महादेवी हत्तीची तयारी, तर दुसऱ्या बाजूला ‘वनतारा’चे मीम्स… या सगळ्या गदारोळात आमचा ‘अवतार’ वाघोबा मात्र कुठेतरी शांतपणे पुढच्या ‘डेस्टिनेशन’चा विचार करत असेल!

 

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; दोन मोटरसायकलींसह बोकडांचीही चोरी

Next Post

“माझा चेहरा तरी ओळखाल ना?” – अजित पवारांच्या एका फोनमुळे प्रशासनात खळबळ

Next Post
“माझा चेहरा तरी ओळखाल ना?” – अजित पवारांच्या एका फोनमुळे प्रशासनात खळबळ

"माझा चेहरा तरी ओळखाल ना?" - अजित पवारांच्या एका फोनमुळे प्रशासनात खळबळ

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
  • उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली
  • धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
  • आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!