• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळा शिवारात घरातच गांजाची शेती, पोलिसांच्या धडक कारवाईत १.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त; वृद्धाला अटक

admin by admin
September 22, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड
0
SHARES
649
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा –  आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या राहत्या घरामागेच गांजाची अवैध लागवड करणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्धावर येरमाळा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १ लाख ८४ हजार रुपये किमतीचा ९ किलो २०० ग्रॅम ओला गांजा जप्त केला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. भावसाहेब प्रल्हाद राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येरमाळा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक भालेराव यांना २१ सप्टेंबर २०२५ रोजी एका गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार, येरमाळा येथील भावसाहेब राऊत हे आपल्या घरामागील मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करून त्याचे संगोपन करत होते. या माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा पोलिसांनी सापळा रचून राऊत यांच्या घरावर छापा टाकला.

छाप्यादरम्यान, घराच्या पाठीमागे लावलेली ओलसर गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ९ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला, ज्याची अंदाजित किंमत १,८४,००० रुपये आहे.

याप्रकरणी आरोपी भावसाहेब प्रल्हाद राऊत (वय ६० वर्षे) याच्या विरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २६२/२०२५ नुसार एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम २० (ब), (IIB), ८ (सी), आणि २० (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक भालेराव, पोलीस उपनिरीक्षक  भोजगुडे, आवारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख, तिगाडे, पोलीस नाईक सय्यद, पोलीस अंमलदार पठाण, अमोल जाधव आणि चालक दराडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Previous Post

तुळजापुरात दरोड्याचा कट उधळला; शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, पाच जणांना अटक

Next Post

अंबी पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी होणारी गोवंश वाहतूक रोखली; ३.९० लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

अंबी पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी होणारी गोवंश वाहतूक रोखली; ३.९० लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

दारुड्यांच्या भांडणातून दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि दगडफेक

July 24, 2026
“मी काय खात नाही” नंतर आता थेट “खोडा घालायला मी काही राणा दादा नाही!” अर्चनाताईंच्या ‘प्रामाणिकपणा’ला तोड नाही!

“मी काय खात नाही” नंतर आता थेट “खोडा घालायला मी काही राणा दादा नाही!” अर्चनाताईंच्या ‘प्रामाणिकपणा’ला तोड नाही!

July 24, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!