• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 8, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात दरोड्याचा कट उधळला; शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, पाच जणांना अटक

admin by admin
September 22, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दरोड्याचा कट उधळला; शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, पाच जणांना अटक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धारशिव: तुळजापूर येथील शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. नळदुर्ग-तुळजापूर बायपास रस्त्यावर सापळा रचून पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे धारदार शस्त्र जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी बीड जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तुळजापूर शहरात नवरात्रोत्सवानिमित्त गस्त घालत असताना, त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. या माहितीनुसार, नळदुर्ग-तुळजापूर बायपास रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये (क्र. एम.एच. ११ एके ९६२१) काही इसम दरोड्याच्या तयारीत थांबले होते. पथकाने तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन सायंकाळी ७:१५ वाजता त्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच गाडीतील दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने त्यांना आणि गाडीतील इतर तिघांनाही जागेवरच पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र, अधिक चौकशीनंतर त्यांनी आपली नावे सांगितली, जी खालीलप्रमाणे आहेत:

  • रोहित ऊर्फ तात्या अंकुश गायकवाड (वय ३६, रा. सुभाष कॉलनी, बीड) 
  • अमर आसाराम गायकवाड (वय २३, रा. नळवंडी नाका, बीड) 
  • राजेश अभिमान जाधव (वय २७, रा. चऱ्हाटा, जि. बीड) 
  • राजाभाऊ ज्ञानदेव यादव (वय २५, रा. वांगी, जि. बीड) 
  • प्रशांत दिलीप डाके (वय २५, रा. स्वराज्य नगर, बीड) 
  •  पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, यापैकी काही आरोपींवर दरोड्याची तयारी, खून आणि चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या गाडीची तपासणी केली असता, त्यात एक लोखंडी धारदार कोयता सापडला. या पाचही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे1 त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५) आणि शस्त्र अधिनियम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि . अमोल मोरे, सपोनि सचिन खटके आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Previous Post

परंडा येथे मालमत्तेच्या वादातून एकाला मारहाण; सोन्याची साखळी आणि रोकड लंपास

Next Post

येरमाळा शिवारात घरातच गांजाची शेती, पोलिसांच्या धडक कारवाईत १.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त; वृद्धाला अटक

Next Post
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

येरमाळा शिवारात घरातच गांजाची शेती, पोलिसांच्या धडक कारवाईत १.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त; वृद्धाला अटक

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

September 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

September 8, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर वारंवार लैंगिक अत्याचार; लग्नासाठी बेल्टने मारहाण करत धमकी
  • उमरगा : न्यायालयात प्रलंबित घराच्या जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; पारेने भिंत पाडली
  • धोत्री : लोखंडी अँगलच्या पैशांवरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; तामलवाडी पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
  • आरळी (बु.) : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी पान्याने मारहाण; दोघांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • सावरगाव : मध्यरात्री घरफोडी करत देवघरातील १३ तोळे चांदीचे दागिने अन् मंदिरातील रोकड लंपास; तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!