• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा: “त्याला पोलिसांना का धरून दिले?” विचारत महिलेसह इतरांवर प्राणघातक हल्ला

 पिस्तुलाच्या दस्त्याने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न

admin by admin
October 7, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
247
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा –  “धानाजी पवार याला पोलिसांच्या हवाली का केले?” याचा जाब विचारत एका ६५ वर्षीय महिलेसह अन्य दोघांवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील इडा येथे घडली आहे. या हल्ल्यात एका व्यक्तीच्या डोक्यावर पिस्तुलाने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी घडली असून, याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात ९ जणांसह अन्य ५ अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुदामती जयसिंग शिंदे (वय ६५, रा. इडा, ता. भूम) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुदामती शिंदे आणि सागर जयसिंग शिंदे हे ४ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास इडा येथील साखर कारखान्यासमोरील हॉटेल सातबारा समोर उभे होते. यावेळी आरोपी लखन कांतीलाल पवार, बॉबी देओल उर्फ बाबासाहेब पवार, उमेश पवार, मुकेश पवार, आदेश पवार, धिरज पवार, कांतीलाल पवार, लायन सखाराम भोसले (सर्व रा. सावदरवाडी, ता. परंडा) आणि इतर पाच अनोळखी इसम स्कुटी आणि टाटा नेक्सॉन कारमधून त्याठिकाणी आले.

आरोपींनी फिर्यादीला “तुम्ही धानाजी झकिऱ्या पवार याला पोलिसांना का धरून दिले?” असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व इतरांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केली. याचवेळी, आरोपी लखन पवार याने त्याच्या हातातील पिस्तुलाने राहुल बाबुराव भोसले यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, उपस्थित सर्वांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

या हल्ल्यानंतर जखमी सुदामती शिंदे यांनी ६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांन्वये, तसेच भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका व दोन नगरपंचायतींचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; राजकीय घडामोडींना वेग

Next Post

तुळजापूर: अपंग व्यक्तीवर लोखंडी कत्तीने हल्ला; बाप-लेकावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

तुळजापूर: अपंग व्यक्तीवर लोखंडी कत्तीने हल्ला; बाप-लेकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group