• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, October 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा नियोजन: २४६ कोटींच्या कामांना कात्री, फक्त २२ कोटींना मंजुरी; पालकमंत्री-आमदार संघर्षाची शक्यता

admin by admin
October 14, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हा नियोजन: २४६ कोटींच्या कामांना कात्री, फक्त २२ कोटींना मंजुरी; पालकमंत्री-आमदार संघर्षाची शक्यता
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव जिल्ह्याच्या वार्षिक योजनेतील तब्बल २४६ कोटी रुपयांच्या कामांची प्रशासकीय मान्यता रद्द करून केवळ २२.४८ कोटी रुपयांच्या कामांना हिरवा कंदील दाखवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नियोजन विभागाने आज, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून हे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना मोठा धक्का बसला असून, त्यांचे आणि भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

शासनाच्या पत्रात काय?

नियोजन विभागाचे उपसचिव नि. भा. खेडकर यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांना पाठवण्यात आले आहे या पत्रानुसार, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२४-२५ अंतर्गत कामांना १ एप्रिल २०२५ रोजी स्थगिती देण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने १९ ऑगस्ट २०२५ रोजी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, काही कामांवरील स्थगिती उठवण्याची शिफारस करण्यात आली होती. 

शासन मान्यतेने केवळ १०६ कामांवरील स्थगिती उठवण्यात आली असून, या कामांची एकूण किंमत २२ कोटी ४७ लाख ५१ हजार रुपये आहे. याव्यतिरिक्त, ज्या कामांचे कार्यारंभ आदेश (Work Order) निघालेले नाहीत, अशा इतर सर्व कामांना दिलेली प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली आहे.

‘या’ कामांना मिळाली मंजुरी:

शासनाने स्थगिती उठवलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे:

  • पोलिस व तुरुंग विभागासाठी पायाभूत सुविधा: ३ कामांसाठी १४ कोटी ८ लाख रुपये.
  • गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्था: ८ कामांसाठी १ कोटी १९ लाख रुपये.
  • कार्यालयीन व शासकीय निवासी इमारती: ३० कामांसाठी २ कोटी २१ लाख रुपये.
  • सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभागाची कामे: ६५ कामांसाठी ४ कोटी ९८ लाख रुपये.

पालकमंत्री प्रताप सरनाईक -आमदार राणा पाटील संघर्षाची शक्यता

एकूण २६८ कोटींच्या नियोजित आराखड्यापैकी केवळ २२.४८ कोटींची कामे मंजूर झाल्याने, उर्वरित सुमारे २४६ कोटींची विकासकामे आता थांबली आहेत. ही बहुतेक कामे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या शिफारशीने मंजूर झाल्याचे मानले जाते. आता या कामांना शासनाने कात्री लावल्याने पालकमंत्र्यांच्या अधिकाराला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, शासनाने दिलेल्या सूचनेनुसार, रद्द करण्यात आलेल्या कामांची खरोखरच गरज असल्यास, जिल्हा नियोजन समितीला २०२५-२६ या आर्थिक वर्षात त्यासाठी नव्याने प्रशासकीय मान्यता घ्यावी लागेल. तसेच, सन २०२४-२५ साठी वितरित करण्यात आलेला निधी ३१ मार्च २०२६ पर्यंत खर्च करणे बंधनकारक असेल. या घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार राणा पाटील यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Previous Post

धाराशिवच्या विकासाला सहा महिने ‘ब्रेक’ लावणाऱ्या राणा पाटलांची ऐन बैठकीच्या तोंडावर ‘फेसबुक’ घोषणा

Next Post

उमरगा: थांब्यावर बस न थांबवल्याने एसटी वाहकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: थांब्यावर बस न थांबवल्याने एसटी वाहकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार

October 24, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कळंब : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण

October 24, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला

October 23, 2026

Recent Posts

  • भूम : अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लॉजवर लैंगिक अत्याचार
  • कळंब : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाला लोखंडी कड्याने मारहाण
  • भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई
  • धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!