• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा तालुक्यात क्षुल्लक कारणांवरून हाणामारी; वृद्ध गंभीर जखमी, तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

admin by admin
October 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
211
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: उमरगा तालुक्यात शेतीच्या वादातून मारहाण झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. गाय बांधण्याच्या कारणावरून एका वृद्धाला विळा आणि काठीने गंभीर मारहाण करण्यात आली, तर शेतातून जाण्याच्या वादातून दुसऱ्या एका तरुणावर कत्तीने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या दोन्ही प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गाय बांधण्याच्या वादातून वृद्धाला मारहाण

कोळेवाडी येथील रहिवासी भगवान मारुती पालमपल्ले (वय ७२) यांना गावातीलच व्यंकट विठोबा पालमपल्ले याने गायी बंधाऱ्यावर बांधण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी, विळा व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास कोळेवाडी शिवारातील सर्वे नंबर १७ मध्ये घडली. याप्रकरणी जखमी भगवान पालमपल्ले यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून आरोपी व्यंकट पालमपल्ले याच्या विरोधात उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ११५(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

शेतातून जाण्यावरून कत्तीने हल्ला

दुसऱ्या घटनेत, नाईचाकुर येथील रहिवासी विष्णू गोविंद माने (वय ३३) यांना गावातीलच ईश्वर उर्फ लिंबराज पांडुरंग माने आणि पांडुरंग बळीराम माने या दोघांनी मारहाण केली. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चिरेवाडी शिवारातील गट नंबर १०/२ मध्ये शेतातून जाण्याच्या कारणावरून आरोपींनी विष्णू माने यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी आणि कत्तीने मारहाण केली. तसेच, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विष्णू माने यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यात क्षुल्लक कारणांवरून कायदा हातात घेण्याचे प्रकार वाढले असून, पोलीस दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकाला लुटले; दोन लाखांचा ऐवज लंपास

Next Post

मुरुम : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वाचा फोडल्यास जीवे मारण्याची धमकी; तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

मुरुम : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वाचा फोडल्यास जीवे मारण्याची धमकी; तरुणावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group