• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर : घाटशिळ रोडवर भरदिवसा व्यावसायिकाला लुटले; सोन्या-चांदीसह ३७ हजारांचा ऐवज लंपास

admin by admin
October 29, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
859
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: शहरातील घाटशिळ रोड परिसरात पावसामुळे आडोशाला थांबलेल्या एका व्यावसायिकाला दोन अज्ञात इसमांनी लुटल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेत सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ३७,००० रुपयांचा ऐवज हिसकावून चोरट्यांनी पलायन केले.  ही घटना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत राघवेंद्र बालाजीसिंग राजपुत (वय ३३, रा. केसरजवळगा, ता. उमरगा) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजपुत हे २२ ऑक्टोबर रोजी आपल्या पत्नीला सणानिमित्त माहेरी सोडून तुळजापूर येथे आले होते. येथील पाटीलवाडा हॉटेलमध्ये जेवण करून ते परत जात असताना पाऊस सुरू झाला.

पावसामुळे ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घाटशिळ रोड येथील एका काट्यावर थांबले असता, दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले, त्यांनी राजपुत यांना बाजूला घेऊन त्यांच्याजवळील ऐवज हिसकावून घेतला व तेथून पळ काढला.

या घटनेत चोरट्यांनी १५,००० रुपये किमतीचे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले , २,००० रुपये किमतीचे तीन तोळ्याचे चांदीचे कडे १२,००० रुपयांचा रेडमी कंपनीचा मोबाईल आणि ५०० रुपयांच्या १६ नोटा अशी एकूण ८,००० रुपयांची रोख रक्कम , असा एकूण ३७,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 

घटनेनंतर राजपुत यांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. अखेर त्यांनी २८ ऑक्टोबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

फिर्यादीचा पोलिसांवर गंभीर आरोप

राघवेंद्र राजपुत यांनी आरोप केला आहे की, “लूटमार झाल्यानंतर त्याच दिवशी (२२ ऑक्टोबर) तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. उलट, निरीक्षक मांजरे यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.”

यानंतर राजपुत हे आपल्या गावी परतले. दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजपा नेते संताजी चालुक्य यांना फोनवरून घडलेला प्रकार सांगितला. श्री. चालुक्य यांनी निरीक्षक मांजरे यांना फोन केल्यानंतर पोलिसांनी केवळ किरकोळ गुन्हा नोंदवल्याचा आरोपही राजपुत यांनी केला आहे.

या प्रकारानंतर, राजपुत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया राज्य प्रमुखांशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली. या तक्रारीची दखल घेत, राज्य सोशल मीडिया प्रमुखांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांशी (SP) चर्चा केली. अखेर, पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर निरीक्षक मांजरे यांनी २८ ऑक्टोबर रोजी रीतसर गुन्हा दाखल करून घेतला.

या संपूर्ण प्रक्रियेत निरीक्षक मांजरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोपही फिर्यादी राजपुत यांनी केला आहे. या गंभीर आरोपांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.

श्री क्षेत्र तुळजापूर शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्या, पाकीटमारी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज किमान एक तरी गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. तुळजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मांजरे यांच्या निष्क्रिय आणि ढिसाळ कारभारामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून, भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत आहे.

Previous Post

‘हिशोब बरोबर’.. अन् रस्त्याचा ‘गेम ओव्हर’!

Next Post

सत्तेचा ‘अहंकार’ अन् धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’!

Next Post
‘….एक शुक्राचार्य प्रकटला!’; धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’, आमदार-पालकमंत्र्यांचा ‘हिशोब बरोबर’… पण जनतेचं काय?

सत्तेचा 'अहंकार' अन् धाराशिवच्या विकासाचा 'खेळखंडोबा'!

ताज्या बातम्या

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

February 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group