• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये राजकीय गुंडगिरी? ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला

नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर शहरात तणाव; हल्ला पूर्वनियोजित असल्याचा निंबाळकरांचा दावा

admin by admin
October 31, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 3 mins read
धाराशिवमध्ये राजकीय गुंडगिरी? ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर जीवघेणा हल्ला
0
SHARES
3.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रोहित निंबाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री एका दुकानात घुसून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हा हल्ला भाजप कार्यकर्ते विजय राठोड आणि त्यांच्या साथीदारांनी केल्याचा गंभीर आरोप स्वतः रोहित निंबाळकर यांनी केला आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित निंबाळकर हे एका दुकानात बसले होते. यावेळी विजय राठोड हा त्याच्या साथीदारांसह तेथे आला. त्याने आधी दुकान मालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अचानक निंबाळकर यांच्यावर हल्ला चढवत त्यांना मारहाण सुरू केली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नागरिकांमध्ये या घटनेविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

हल्ला पूर्वनियोजित कट – रोहित निंबाळकर

या हल्ल्याबाबत बोलताना रोहित निंबाळकर यांनी हा हल्ला एक ‘पूर्वनियोजित कट’ असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, “मी ज्या दुकानात बसलो होतो, तिथे विजय राठोड आला. त्याने दुकान मालकाशी वाद घातला. मला वाटले की हा त्यांचा वैयक्तिक वाद असेल. मात्र, त्याने अचानक माझ्यावर हल्ला करत मारहाण सुरू केली. माझ्यावर झालेला हल्ला हा कट असून, मी सदर घटनेविरोधात पोलिसांकडे तक्रार देणार आहे.”

राजकीय वैमनस्यातून हल्ला?

हा हल्ला स्थानिक राजकारणातील स्पर्धा आणि कुरघोडीतून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हल्लेखोर विजय राठोड हा भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं बोललं जात आहे. आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून शहरात गुंडगिरी सुरू असून, धाराशिव शहरातील राजकारण गुन्हेगारीच्या दलदलीत ओढले जात असल्याचा आरोप या घटनेच्या निमित्ताने होत आहे. मुख्य संशयित विजय राठोड याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

नागरिकांमध्ये संताप; कारवाईची मागणी

धाराशिव शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. राजकीय वैमनस्यातून होणारे हल्ले आणि मारहाणीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, ‘शहरात कायद्याचा धाक उरला आहे का?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून हल्लेखोरांवर आणि या षडयंत्रामागील सूत्रधारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Dharashiv Live (@dharashiv.live.news)

 

Previous Post

धाराशिव: शासकीय तंत्रनिकेतन मागे हाय-टेक मटका अड्ड्यावर धाड

Next Post

धाराशिवचा १४० कोटींचा रस्ता… भाग ३ : मी आता ‘आंदोलन-पॉईंट’ झालोय!

Next Post
‘….एक शुक्राचार्य प्रकटला!’; धाराशिवच्या विकासाचा ‘खेळखंडोबा’, आमदार-पालकमंत्र्यांचा ‘हिशोब बरोबर’… पण जनतेचं काय?

धाराशिवचा १४० कोटींचा रस्ता... भाग ३ : मी आता 'आंदोलन-पॉईंट' झालोय!

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!