• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषद निवडणूक: भाजपचे उमेदवार अमित शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप

 'या' कारणास्तव उमेदवारी रद्द करण्याची मागणी, उद्या होणार सुनावणी

admin by admin
November 18, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव नगर परिषद निवडणूक: भाजपचे उमेदवार अमित शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ७ मधील राजकारण तापले आहे. या प्रभागातील भाजपचे उमेदवार अमित दिलीपराव शिंदे आणि त्यांच्या पत्नी वंदना अमित शिंदे यांच्या उमेदवारी अर्जावर आज प्रतिस्पर्धी उमेदवाराने हरकत घेतली आहे. अमित शिंदे हे नगर परिषदेचे ‘लाभधारक’ असल्याचा दावा करत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, यावर उद्या (बुधवारी) सुनावणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 प्रभाग क्रमांक ७ (सर्वसाधारण) मधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार कृष्णा पंडित मुंडे यांचे प्रतिनिधी बाळासाहेब वसंतराव सुभेदार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी आक्षेप नोंदवला आहे.

नेमका आक्षेप काय?

हरकत अर्जानुसार, उमेदवार अमित शिंदे हे धाराशिव नगर परिषदेचे आर्थिक लाभधारक आहेत. धाराशिव नगर परिषदेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील (सिटी सर्व्हे क्र. १०५, शीट क्र. ५९) दुकान क्रमांक १४, ज्याचे क्षेत्र २७.८८ चौ.मी. आहे, या जागेच्या वापरासाठी अमित शिंदे यांनी नगर परिषदेसोबत नोंदणीकृत करारनामा (क्र. ४६१५/२०२५) केलेला आहे.

शिवशक्ती डेव्हलपर्सने बीओटी तत्त्वावर हे संकुल बांधले असून, या मालमत्तेबाबत अमित शिंदे यांचा नगर परिषदेशी थेट आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा आक्षेपार्धात करण्यात आला आहे.

कायद्याचा आधार काय?

महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमाचे कलम १६ (१) (आय) आणि १६ (१) (जे) नुसार, ज्या व्यक्तीचा नगर परिषदेच्या कोणत्याही कामात, करारात किंवा मालमत्तेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या आर्थिक हितसंबंध असतो, अशी व्यक्ती नगर परिषदेचा सदस्य होण्यास अपात्र ठरते. याच नियमाचा आधार घेत अमित शिंदे आणि वंदना शिंदे (पती-पत्नी आणि एकत्र कुटुंब असल्याने दोघांचे हितसंबंध एकच) यांचा नामनिर्देशन अर्ज रद्द करावा, अशी मागणी कृष्णा मुंडे यांनी केली आहे.

या आक्षेपावर उद्या ( बुधवार  ) सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे, अमित शिंदे हे भाजपचे शहराध्यक्ष आहेत. शिंदे यांची उमेदवारी कायम राहणार की रद्द होणार, याकडे प्रभागाचे लक्ष लागले आहे.

Previous Post

परंडा नगरपरिषदेत राजकीय राडा; सावंत आणि मोटे गट भिडले, जोरदार दगडफेक

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; वाशीत लाखो रुपयांच्या तारा, तर उमरग्यात शेतकऱ्यांचे पशुधन लंपास!

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; वाशीत लाखो रुपयांच्या तारा, तर उमरग्यात शेतकऱ्यांचे पशुधन लंपास!

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026
दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम

September 5, 2026
तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!

September 5, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
  • दुधाळवाडीत ४५ ते ५० दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा; चाऱ्याचा गंभीर प्रश्न, दूध उत्पादनावर परिणाम
  • तुळजापूरची सोयाबीन वाळली, पण राणादादांना चिंता तानाजी सावंतांच्या मतदारसंघाची!
  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!