लोहारा : आरोपी नामे- सिद्राम दगडु बादुले, वय 50 वर्षे, सोबत मयत नामे- लक्ष्मण विठ्ठल पाटील, वय 45 वर्षे, दोघेही रा. वडगाववाडी, ता. लोहारा, जि. धाराशिव हे दोघे दि.15.09.2023 रोजी 06.30 वा. सु. धानुरी पाटी ते मळेगाव रोडवरुन अशोक पाटील यांचे शेताजवळून मोटरसायकल क्र एमएच 25 एएस 2304 ही वर बसून जात होते. दरम्यान सिद्राम बादुले यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालविल्याने अपघात होवून लक्ष्मण पाटील हे गंभीर जखमी झाले व उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी नामे- अनिता लक्ष्मण पाटील, वय 35 वर्षे, रा. वडगाववाडी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.03.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : मयत नामे- सुनिल धोंडीबा मुंढे, रा.गौर, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.10.10.2023 रोजी 10.30 वा. सु. येरमाळा ते येडशी रेाडलगत बाबासाहेब वणवे यांचे शेताजवळ स्कुटी क्र एमएच 25 एक्यु 6916 ही रस्त्याच्या बाजूला उभी करुन थांबले होते. दरम्यान पल्सर मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 0613 चा चालक आरोपी नामे- बाबासाहेब कांतीलाल पवार, रा. सावदरवाडी, ता. परंडा जि. धाराशिव यांनी त्यांचे ताब्यातील पल्सर मोटरसायकल ही भरधाव वेगात, हायगई व निष्काळजीपणे चालवून सुनिल मुंढे यांचे स्कुटीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात सुनिल मुंढे हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे- रोहीत सुनिल मुंढे, वय 29 वर्षे, रा. उपळाई ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.03.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
तुळजापूर :आरोपी नामे- 1) रविंद्र सुग्रीव मस्के, 2) प्रमिला रविंद्र मस्के, दोघे रा. बारुळ, ता. तुळजापूर जि. धाराशिव 3) रुक्मिणी आनंदा चंदनशिव, रा. वडगाव लाख ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.01.01.2024 रोजी 21.00 वा. सु. बारुळ येथे फिर्यादी नामे-सुग्रीव भैरु मस्के, वय 65 वर्षे रा. बारुळ, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जागेच्या व जमीनीच्या वाटणीच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी व मुलगा यांनाही नमुद आरोपीने शिवागाळ करुन लाथांबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुग्रीव मस्के यांनी दि.03.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.