तुळजापूर : फिर्यादी नामे-पांडुरंग रामराव सावंत, वय 51 वर्षे, रा. पिंगळी(बा) ता. जि. परभणी यांचे मालकीची ट्रक क्र एमएच 26 एडी 7019 मध्ये परभणी येथील मोंढा येथुन सोयाबीनचे 413 पोते पोहच करण्यासाठी सदगुरु ॲग्रो इंडस्ट्रीज एमआयडीसी चिंचोली सोलापूर येथे जात असताना दि. 02.01.2024 रोजी 08.00 वा. पुर्वी सिंदफळ पांढरे वस्ती लातुर बायपास येथे ट्रक उभी करुन थांबले असता अज्ञात व्यक्तीने ट्रक मधील सोयाबीन अंदाजे 1,19,400₹ किंमतीचे 48 सोयाबीनचे पोते चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- पांडुरंग सावंत यांनी दि.03.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- डॉ. चंद्रकांत किसन आयवळे, वय 45 वर्षे, रा. जिल्हा क्षयरोग केंद्र धाराशिव यांचे जिल्हा क्षयरोग केंद्र धाराशिव येथील कार्यायातील इलेक्ट्रीक 01 एचपी ची पानबुडी मोटर व 5 फुट वायर असा एकुण 3,000 ₹ किंमतीची मोटर ही दि.28.12.2023 रोजी 18.00 ते दि. 29.12.2023 रोजी 10.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- डॉ. चंद्रकांत आयवळे यांनी दि.03.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-फिर्यादी नामे- सुनिता बाबासाहेब भावले, वय 45 वर्षे, रा. सुखशांती रेसीडेन्सी ए-5 कॅनल रोड, बीड ह.मु. ज्ञानेश्वर मंदीराच्या पाठीमागे, अण्णा मुंढे यांचे घरी धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची पांढऱ्यारंगाची स्कुटी क्र एमएच 23 एके 3532 जिचा चेसी नं- ME4jf502ket498412 व इंजिन नं-JF50ET1496731 ही दि. 17.12.2023 रोजी 23.00 ते दि. 18.12.2023 रोजी 06.00 वा. सु. ज्ञानेश्वर मंदीराच्या पाठीमागे, अण्णा मुंढे यांचे घरा समोर उभी केलेली अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुनिता भावले यांनी दि.03.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.