• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, July 4, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रेल्वे स्टेशनवरील उस्मानाबाद नाव कधी पुसणार ?

धाराशिव नामांतराची अंमलबजावणी करा - शिवसेना ( उबाठा )

admin by admin
January 8, 2024
in राजकारण
रेल्वे स्टेशनवरील उस्मानाबाद नाव कधी पुसणार ?
0
SHARES
328
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्यात आलेेले आहे. शासनाच्या इतर विभागांनी यापूर्वीच याची अंमलबजावणी करुन नामफलक बदलले; परंतु रेल्वे विभागाकडून अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे रेल्वे विभागानेही उस्मानाबाद ऐवजी धाराशिव नामकरणाची अंमलबजावणी तातडीने करावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन शिवसेना (उबाठा ) शहरप्रमुख तथा नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव यांनी केली आहे.

खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर, आमदार कैलास (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रेल्वेच्या सोलापूर विभागीय व्यवस्थापकांना याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण व्हावे, हे शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याची घोषणा केली. त्यानंतर सध्याच्या राज्य सरकारने व केंद्र सरकारने या दोन्ही शहरांच्या नावाला अनुमती दिली. त्यानंतर बदलेल्या नावाची अंमलबजावणी शासनाच्या इतर विभागांनी यापूर्वीच सुरू केली आहे. परंतु आपल्या रेल्वे विभागाकडून अद्यापही याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. ही अत्यंत खेदाची व गंभीर बाब आहे.

आपल्या विभागाकडून धाराशिव नावाची अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्यामुळे प्रवासी व नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याची दखल घेऊन आपल्या विभागाकडून तातडीने उस्मानाबाद ऐवजी धाराशिव अशी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच धाराशिव रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तेथील कामेही जलदगतीने करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी. उस्मानाबाद ऐवजी धाराशिव या नामकरणाची आपल्या विभागाकडून तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी

Next Post

नळदुर्ग शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी

Next Post
नळदुर्ग शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी

नळदुर्ग शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंबमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; तीन लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

July 4, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यातील कुंभेफळ येथे जुन्या वादातून ५२ वर्षीय व्यक्तीला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

July 4, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यातील कारंजा येथे शेत रस्त्याच्या वादातून बाप-लेकाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

July 4, 2025
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिवमध्ये तरुणाला ऑनलाईन गंडा; दुबई पोलिसांच्या नावाने १ लाख २० हजारांची फसवणूक

July 4, 2025
माणसाने माणसाशी कसं वागावं, हे विठ्ठल एका भक्ताला सांगतोय…

संत भानुदास महाराज: ज्यांनी श्री विठ्ठलाला हंपीहून परत आणले…

July 4, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group