पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यप्रेम दत्तात्रय मुंढे (सध्या रा. बावी, ता. भूम, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास जांब रोड, बावी येथील सत्यप्रेम दत्तात्रय मुंढे यांच्या क्लिनिकमध्ये ही कारवाई करण्यात आली.
संबंधित व्यक्तीकडे मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आवश्यक पात्रता नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून वैद्यकीय व्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले. रुग्णांकडून फी घेऊन उपचार करून त्यांची फसवणूक केली जात होती. तसेच आवश्यक वैद्यकीय ज्ञान आणि कायदेशीर पात्रता नसताना उपचार करून नागरिकांच्या आरोग्याला व जीविताला धोका निर्माण केला जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. मारुती गोमाजी पोतरे (वय ५९) यांनी ६ नोव्हेंबर रोजी भूम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरून सत्यप्रेम मुंढे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१९, ३१८(४), ३३६, ३४०(२) तसेच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट कलम ३३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलीस करीत आहेत.



