पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील उत्रेश्वर ताकपेरे (वय ३७, रा. लातूर रोड, भीमनगर, येडशी, ता. जि. धाराशिव) हे १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास येडशी येथील आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले.
अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांचे गुप्तपणे व बेकायदेशीररीत्या अपहरण करून नेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी त्यांची पत्नी शिवकन्या सुनील ताकपेरे (वय ३०) यांनी ५ नोव्हेंबर रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील ताकपेरे यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलीस करीत आहेत.



