धाराशिव : शहरातील जुन्या बस डेपो परिसरात विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या एका इसमाविरुद्ध धाराशिव शहर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी तलवार जप्त करून संबंधिताविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फयाज हकीश शेख (वय ४३, रा. जुना बस डेपो, धाराशिव) हा ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास जुन्या बस डेपो परिसरात तलवार घेऊन फिरत होता.
लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने विनापरवाना व बेकायदेशीररीत्या तलवार जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तलवार जप्त केली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर हरिदास अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फयाज शेख याच्याविरुद्ध शस्त्र कायदा कलम ४ व २५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३५२ आणि ३५१(२) अन्वये धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




