पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान बाशा मकानदार (रा. अक्कलकोट, ता. जि. सोलापूर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी दशरथ तुकाराम घोंगते (वय ६०, रा. कसई, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांना आरोपीने घराचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी बांधकामाचा करार करण्यात आला होता.
२६ मार्च २०२६ ते २७ मे २०२६ या कालावधीत आरोपीने बांधकाम आणि बांधकाम साहित्याच्या नावाखाली फिर्यादीकडून ३ लाख ३३ हजार रुपये रोख आणि ५० हजार रुपये ऑनलाइन, अशी एकूण ३ लाख ८३ हजार रुपयांची रक्कम घेतली.
मात्र, बांधकामाच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दशरथ घोंगते यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रमजान मकानदार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.




