• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, January 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव नगर परिषद निवडणूक: प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी २५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा ‘बॉम्ब’!

​भाजपचा ठाकरे सेनेवर गंभीर आरोप; मकरंद राजेनिंबाळकरांचे जोरदार प्रत्युत्तर

admin by admin
November 30, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव नगर परिषद निवडणूक: प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी २५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा ‘बॉम्ब’!
0
SHARES
405
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

​धाराशिव: धाराशिव नगर परिषद निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होत असून, सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मात्र, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने आज पत्रकार परिषद घेत ठाकरे सेनेवर तब्बल २५० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा सनसनाटी आरोप केला आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी हे आरोप फेटाळत भाजपवर पलटवार केला आहे.

​भाजपचा नेमका आरोप काय?

 रविवारी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना नितीन काळे यांनी सांगितले की, “मागील काळात म्हणजेच २०१६ ते २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत धाराशिव पालिकेवर ठाकरे सेनेची सत्ता होती. या काळात ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी संगनमत करून तब्बल २५० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे.”

​काळे यांनी पुढे दावा केला की, नगरपालिकेअंतर्गत अस्तित्वात नसलेल्या स्वच्छतागृहांच्या साफसफाईच्या नावाखाली लाखो रुपये हडपण्यात आले आहेत. हा आकडा एक-दोन नव्हे, तर वेगवेगळ्या दोनशे प्रकरणांत तब्बल २४२ कोटींपेक्षा अधिक आहे आणि हे सर्व शासकीय लेखापरीक्षण अहवालातून (Audit Report) समोर आले असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

​भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी यावर कडाडून टीका करताना, “जनतेच्या पैशावर दिवसाढवळ्या डल्ला मारणाऱ्यांना जनता पुन्हा पालिकेत निवडून देणार का?” असा खरमरीत सवाल उपस्थित केला आहे.

​मकरंद राजेनिंबाळकरांचे प्रत्युत्तर

भाजपच्या या गंभीर आरोपांवर शिवसेना (ठाकरे गट) माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी तातडीने उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “गेली चार वर्षे विरोधकांनी यावर चकार शब्दही काढला नाही. आता निवडणूक तोंडावर आली असताना केवळ मतदारांची दिशाभूल करण्यासाठी हे खोटे आरोप केले जात आहेत.” भाजपचा हा प्रयत्न अपयशी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“भ्रष्टाचार झाला म्हणता, मग सत्तेत का राहिलात?” – तानाजी जाधवर यांचा भाजपला रोखठोक सवाल

भाजपच्या या आरोपांची खिल्ली उडवत तानाजी जाधवर यांनी भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “अचानक उठायचं आणि अमुक कोटींचा भ्रष्टाचार झाला म्हणायचं, पण गेली चार वर्षे भाजपचे नेते झोपले होते का? डिसेंबर २०२१ पर्यंत आम्ही भाजपसोबतच सत्तेत होतो. त्या काळात जर भ्रष्टाचार होत होता, तर मग सत्तेतून स्वाभिमानाने बाहेर का पडला नाहीत? त्यावेळीच तक्रारी का केल्या नाहीत?”

​‘उपनगराध्यक्ष कोण होतं, विसरलात का?’

जाधवर यांनी पुढे आठवण करून दिली की, त्या काळात पालिकेचे उपनगराध्यक्ष कोण होते, हे संपूर्ण शहराला माहीत आहे. सत्तेत भागीदार असताना गप्प राहायचे आणि आता निवडणूक आली की मतदारांत संभ्रम निर्माण करण्यासाठी बोंबाबोंब करायची, ही भाजपची जुनी सवय असल्याचे त्यांनी म्हटले.

​‘अर्धवट माहिती देऊन दिशाभूल’

भाजपने सादर केलेल्या पुराव्यांबद्दल बोलताना जाधवर म्हणाले, “तुम्ही लेखापरीक्षण अहवाल (Audit Report) दाखवला, पण त्यानंतर त्याला दिलेले ‘प्रशासकीय उत्तर’ दाखवायला मात्र सोयीस्कररित्या विसरलात. एकतर तुमचा अभ्यास कमी पडला असावा किंवा मतदारांची बुद्धीभेद करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केले असावे.”

​‘जुन्या भाजपला संपवण्याचा डाव?’

यावेळी जाधवर यांनी भाजपमधील अंतर्गत राजकारणावरही बोट ठेवले. ते म्हणाले, “जर वास्तवात एवढा मोठा भ्रष्टाचार असता, तर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषद घेतली असती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. कदाचित जुन्या भाजप निष्ठावंतांना तोंडावर पाडण्यासाठीच हा खटाटोप केला असावा, याचा विचार आमचे मित्र दत्ता कुलकर्णी यांनी करायला हवा होता,” असा चिमटाही त्यांनी काढला.

ऐन मतदानाच्या तोंडावर झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे धाराशिवमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आता मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, हे २ डिसेंबर रोजी स्पष्ट होईल.

Previous Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक: शिवसेनेच्या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुधीर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात मुसंडी

Next Post

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा काटा काढला; ढोकीत जाळून टाकलेल्या ‘राणी’च्या हत्येचा थरार उघड

Next Post
लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा काटा काढला; ढोकीत जाळून टाकलेल्या ‘राणी’च्या हत्येचा थरार उघड

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा काटा काढला; ढोकीत जाळून टाकलेल्या 'राणी'च्या हत्येचा थरार उघड

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भाजप सज्ज; तिकिटासाठी इच्छुकांची मांदियाळी, तब्बल ७१२ अर्ज दाखल

January 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा शहरात निवडणुकीच्या वादातून राडा; तरुणासह पुतण्यावर लोखंडी रॉडने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल

January 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वडगाव (ज) येथे भररस्त्यात तलवारीसह फिरणाऱ्या तरुणावर कारवाई

January 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; चार ठिकाणी घरफोडी व चोऱ्या, ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

January 16, 2026
धाराशिव: व्याजाच्या पैशांच्या वादातून तरुणांनी लुटले सावकाराचे घर

धाराशिव: व्याजाच्या पैशांच्या वादातून तरुणांनी लुटले सावकाराचे घर

January 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group