धाराशिव: तालुक्यातील घाटंग्री येथे गैरकायद्याची मंडळी जमवून एका कुटुंबाला लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत फिर्यादीसह त्यांची आई, भाऊ आणि बहीण जखमी झाले असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७:१५ च्या सुमारास घाटंग्री येथे घडली. फिर्यादी सागरसिंह महादेव राठोड (वय ३१, रा. घाटंग्री तांडा नं १, ता. जि. धाराशिव) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोपींनी हल्ला चढवला.
आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी सागरसिंह, त्यांची आई, भाऊ आणि बहीण यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड आणि काठीने जबर मारहाण केली. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी फिर्यादीचा चावा घेऊन त्यांना जखमी केले.
उपचारानंतर फिर्यादी सागरसिंह राठोड यांनी ३ डिसेंबर रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात खालील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
गुन्हा दाखल झालेले आरोपी: १. गोकुळ खेमा राठोड, २. दिलीप खेमा राठोड , ३. अदित्य गोकुळ राठोड, ४. अजिंक्य गोकुळ राठोड ५. निता उर्फ चिका दिलीप राठोड, ६. चावळाबाई खेमा राठोड (सर्व रा. घाटंग्री) या सर्वांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, १८९(२), १९१(२)(३), १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






