• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ॲड. मंजुषा  साखरे यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद करण्यासाठी प्रशासनाचा होता ‘ट्रॅप’?

ॲड. विशाल साखारेंनी मागितले 'त्या' वेळचे सीसीटीव्ही फुटेज!

admin by admin
December 6, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
 धाराशिव पालिकेची निवडणूक: “अर्ज मागे घेण्यासाठी ‘समजूत’ काढायला येऊ नका, अन्यथा तुमचाच अर्ज होईल अपात्र”
0
SHARES
809
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या दिवशी घडलेल्या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि निवडणूक प्रशासन यांच्यात जोरदार संघर्ष पेटला आहे. प्रशासनाने दिशाभूल करून नगराध्यक्षपदाचा अर्ज बाद करण्याचा ‘डाव’ रचल्याचा गंभीर आरोप जिल्हा प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांनी केला आहे. या सर्व प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी साखरे यांनी आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ‘त्या’ वेळेचे सीसीटीव्ही फुटेज आणि नोंदणी रजिस्टरच्या सत्यप्रतीची लेखी मागणी केली आहे.

नेमकं काय घडलं त्या दिवशी?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने ॲड. मंजुषा विशाल साखरे यांनी नगराध्यक्ष पद आणि प्रभाग क्रमांक ९ (अ) या दोन्ही जागांसाठी पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज छाननी आणि माघारीच्या दिवशी (दि. २१) ॲड. विशाल साखरे हे प्रभाग क्र. ९ (अ) मधील अर्ज मागे घेण्यासाठी गेले होते.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी साखरे यांना सांगितले की, “तुम्ही प्रभागातील अर्ज मागे घेतल्यास, तुमचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज देखील तांत्रिकदृष्ट्या बाद होईल.” अधिकाऱ्यांच्या या वक्तव्यावर साखरे यांनी आक्षेप घेतला. एका पदाचा अर्ज काढला तर दुसऱ्या स्वतंत्र पदाचा अर्ज कसा बाद होईल? यावरून ॲड. विशाल साखरे आणि अधिकारी ओंकार देशमुख यांच्यात कार्यालयातच जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली होती.

फुटेज आणि सीडीआर (CDR) तपासा!

प्रशासकीय अधिकारी मुद्दाम दिशाभूल करत असल्याचा संशय आल्याने ॲड. विशाल साखरे यांनी तात्काळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले ,यामध्ये त्यांनी खालील मागण्या केल्या आहेत:

१. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण (Video Recording) तात्काळ मिळावे.

२. अर्ज मागे घेतल्याची नोंद ज्या रजिस्टरला केली आहे, त्या पानाची सत्यप्रत मिळावी.

विशेष म्हणजे, या निवेदनाच्या शेवटी ॲड. साखरे यांनी आक्रमक पवित्रा घेत हाताने लिहून इशारा दिला आहे की, “सदर कागदपत्रे व फुटेज तात्काळ न मिळाल्यास या प्रक्रियेतील सीडीआर (CDR) आणि एसडीआर (SDR) सुरक्षित ठेवावेत.” प्रशासनाचा हा कथित ‘प्लॅन’ उघडकीस आणण्यासाठी साखरे यांनी कायदेशीर लढाईची तयारी दर्शवली आहे.

Previous Post

 अधिकाऱ्यांनो, तुम्ही जनतेचे ‘सेवक’ आहात की सत्ताधाऱ्यांचे ‘कार्यकर्ते’?

Next Post

नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही ‘रोहयो’चा लाभ द्या; खासदार ओमराजे निंबाळकर यांची लोकसभेत आग्रही मागणी

Next Post
नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही ‘रोहयो’चा लाभ द्या; खासदार ओमराजे निंबाळकर यांची लोकसभेत आग्रही मागणी

नगरपालिका क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही ‘रोहयो’चा लाभ द्या; खासदार ओमराजे निंबाळकर यांची लोकसभेत आग्रही मागणी

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!