• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 तुळजापूर: अपसिंगा येथे शेताच्या बांधावरील पोलवरून राडा; तलवारीने हल्ला, एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

admin by admin
December 11, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
965
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: शेताच्या बांधावरील पोल काढून आमच्या शेतात का रोवला, या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील तिघांनी मिळून दोघा भावांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अपसिंगा (ता. तुळजापूर) येथे घडलेल्या या घटनेत तलवारीचा वापर करण्यात आला असून, फिर्यादीच्या आईलाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत नामदेव डुकरे (वय ४२, रा. अपसिंगा) हे फिर्यादी आहेत. ही घटना ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास कात्री-अपसिंगा रोडवर घडली.

आरोपी नारायण निवृत्ती काळे, शंभू नारायण काळे आणि सुष्मा नारायण काळे (सर्व रा. अपसिंगा) यांनी फिर्यादी हनुमंत डुकरे यांना गाठून, “बांधावरील पोल काढून तो आमच्या शेतात का रोवला?” असा जाब विचारत शिवीगाळ सुरू केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी डुकरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.

भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादीचे भाऊ प्रकाश नामदेव डुकरे यांच्याही डाव्या हातावर मारून त्यांना जखमी करण्यात आले. तसेच फिर्यादीच्या आईला जोरात ढकलून दिले. यावेळी आरोपींनी “तुम्हाला जिवे ठार मारू,” अशी धमकी दिली.

या घटनेनंतर औषधोपचार घेऊन हनुमंत डुकरे यांनी १० डिसेंबर २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), (३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव: आईशी भांडण सुरू असताना चौघांकडून तरुणाला बेदम मारहाण; कुऱ्हाडीचा वापर, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

 धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; मुरुम व तामलवाडीतून दुचाकी लंपास, तर वाशी हद्दीतून टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

 धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; मुरुम व तामलवाडीतून दुचाकी लंपास, तर वाशी हद्दीतून टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!

धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!

August 3, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!