• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, November 9, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या घटनांची मालिका; वाशीत ५ लाखांच्या वीज तारा लंपास, तर तुळजापूर-कळंबमध्ये दुचाकी आणि पशुधनाची चोरी

admin by admin
December 18, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वाशी तालुक्यात तब्बल ५ लाख रुपयांच्या विद्युत तारांची चोरी झाली आहे, तर तुळजापूर, नळदुर्ग आणि तामलवाडी परिसरात चोरट्यांनी दुचाकी, सोन्याचे दागिने आणि चक्क म्हशी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

१. वाशी: कंपनीच्या ५ लाखांच्या तारांची चोरी (वाशी पोलीस ठाणे)

दहीफळ शिवारातील सेरेटिका रिन्युएबलस इंडिया प्रा. लि. कंपनीच्या साईटवरून मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनीयमच्या तारांची चोरी झाली आहे. दि. १२ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ ते ३ च्या सुमारास चोरट्यांनी फॉरेस्टमधील पाणी तलावाकडून खरे वस्तीकडे जाणाऱ्या पॅन्थर लाईनच्या १२ पोलवरील ३३ केव्ही एस.पी.एस.सी. ॲल्युमिनीयमच्या तारा कापून नेल्या. सुमारे ६०० मीटर लांबीच्या या तारांची किंमत अंदाजे ५,००,००० रुपये आहे. याप्रकरणी सेलवा दिनेश मुथू (रा. तामिळनाडू, ह.मु. सरमकुंडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२. पशुधन चोरांचा धुमाकूळ: दीड लाखांचे पशुधन लंपास

  • तामलवाडी: नांदुरी (ता. तुळजापूर) येथील विकास अरविंद मुळुक यांच्या शेतातील गोठ्यातून दोन म्हैस व एक रेडकू असे एकूण ९०,००० रुपयांचे पशुधन चोरट्यांनी दि. १६ डिसेंबरच्या रात्री चोरून नेले. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • नळदुर्ग: इंदीरानगर तांडा (हंगरगा) येथील चंदुलाल धनसिंग चव्हाण यांची ६०,००० रुपये किमतीची मुऱ्हा जातीची म्हैस लोहगाव-नंदगाव शिवारातून चोरट्यांनी पळवली. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

३. तुळजापूर बसस्थानकावर महिलेचे दागिने चोरीला

तुळजापूर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेचे दागिने लंपास केले. किरण मनोज मोहळकर (रा. पंढरपूर) या दि. १६ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बसमध्ये चढत असताना, चोरट्याने त्यांच्या पर्समधील ५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २० हजार रोख असा एकूण ४५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

४. दुचाकी चोरीच्या दोन घटना

  • तुळजापूर: सिंदफळ येथील शुभम फत्तेसिंग कापसे यांची २५,००० रुपये किमतीची टीव्हीएस व्हीक्टर दुचाकी (MH 25 AF 8232) घरासमोरून चोरीला गेली.

  • कळंब: नायगाव येथील ७० वर्षीय वृद्ध बसलिंग उर्फ बसवेश्वर मेनकुदळे यांची २०,००० रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स दुचाकी (MH 25 Z 2650) कळंबमधील जय भवानी फंक्शन हॉलसमोरून चोरीला गेली.

वरिल सर्व गुन्ह्यांत संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ: दोन बंद घरे फोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

Next Post

धाराशिव: शोष खड्ड्याच्या वादातून जहागीरदारवाडी तांड्यावर राडा; कोयत्याने वार करून दोघांना जखमी, ६ जणांवर गुन्हा

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: शोष खड्ड्याच्या वादातून जहागीरदारवाडी तांड्यावर राडा; कोयत्याने वार करून दोघांना जखमी, ६ जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

येडशीत दिवाळीची रात्र ठरली काळरात्र! एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू ; कृष्णा करंडे मृत्यूच्या दाढेतून बचावला

येडशीत दिवाळीची रात्र ठरली काळरात्र! एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू ; कृष्णा करंडे मृत्यूच्या दाढेतून बचावला

November 9, 2026
ऐन दिवाळीत काळाचा घाला! येडशीत भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

ऐन दिवाळीत काळाचा घाला! येडशीत भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

November 9, 2026
माणसाने माणसाशी कसं वागावं, हे विठ्ठल एका भक्ताला सांगतोय…

कान्हा ते विठूराया: विटेवर उभ्या राहिलेल्या परब्रह्माचे रहस्य

November 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव शहर : ज्ञानेश्वर मंदिरासमोर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी महिलेचे गंठण लांबवले;

November 8, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ऊस तोडणीला जाण्याच्या कारणावरून मुर्टा येथे तुंबळ हाणामारी

November 8, 2026

Recent Posts

  • येडशीत दिवाळीची रात्र ठरली काळरात्र! एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू ; कृष्णा करंडे मृत्यूच्या दाढेतून बचावला
  • ऐन दिवाळीत काळाचा घाला! येडशीत भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू
  • कान्हा ते विठूराया: विटेवर उभ्या राहिलेल्या परब्रह्माचे रहस्य
  • धाराशिव शहर : ज्ञानेश्वर मंदिरासमोर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी महिलेचे गंठण लांबवले;
  • तुळजापूर : ऊस तोडणीला जाण्याच्या कारणावरून मुर्टा येथे तुंबळ हाणामारी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!